वैराग/ मुजम्मिल कौठाळकर
वैराग आणि सुर्डी या दोन मंडलातील २३ गावांमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत मिळावी या मागणीसाठी
वैराग मधील छत्रपती शिवाजी चौकामध्ये शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले....
सुर्डी, रस्तापूर ,यावली, मुंगशी वा मालवंडी, मानेगाव, दहिटणे, तुर्कपिंपरी ,तडवळे, ढोराळे, काळेगाव ,गुंडेगाव, इर्ले, इर्लेवाडी, सासुरे, सर्जापूर ,शेळगाव आर, वैराग, लाडोळे ,राळेरास, रातंजन, मुंगशी आर ,धामणगाव (दु) या आंदोलनात या गावातील शेतकरी उपस्थित होते .
त्यामुळे एक तास वाहतुक ठप्प झाली होती.
यावेळी वैराग मंडल अधिकारी विरेश कडगंजि यांना शेतकर्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी [तहसिलदार ह्या मंडलातील असुनही निवेदन घ्यायला आले नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली या शेतकऱ्याच्या मागणीकडे प्रशासन सोयीस्कर रित्या डोळेझाक करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. ]
२४तासात ६५ मि .मी पाऊस झाल्यासच त्यास अतिवृष्टी समजावी असा शासन निर्णय असला तरी सुर्डी, वैराग मंडलामध्ये ३० मी.मी ते ६२.५मी. मी .व शनिवार ९ ऑक्टोबर रोजी ६५ मी .मी पेक्षा जास्त असे सलग सात दिवस अतिवृष्टी झाल्याची नोंद शासन दप्तरी आहे . सुर्डी व वैराग मंडल पंचनाम्यातून वगळल्यामुळे सुर्डो, वैराग मंडळा अंतर्गत येणाऱ्या गावातील नुकसान झालेल्या पिकांचे विमा देताना विमा कंपन्या नकारात्मक भूमिका घेऊ शकतात. त्याचा दुहेरी फटका आम्हा बाधित शेतकऱ्यांना बसेल अशी शक्यता आहे .त्यामुळे सुर्डी वैराग मंडळातील शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसानीची गांभीर्याने शासनाने दखल घ्यावी व उर्वरित गावातील पंचनामे करून भरपाई देण्याबाबतचे आदेश देण्यात यावे अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.