मंगळवेढ्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी बदलले; जाणून घ्या; कुणाची कोणत्या पदावर झाली निवड - Pantnagari Times

Breaking News

Saturday, October 2, 2021

मंगळवेढ्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी बदलले; जाणून घ्या; कुणाची कोणत्या पदावर झाली निवड


 

मंगळवेढा /  प्रतिनिधी


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंगळवेढा तालुकाध्यपदी प्रा.पी.बी. पाटील तर शहराध्यक्षपदी चंद्रशेखर कोंडूभैरी यांची निवड करण्यात आली आहे.


तर तालुका कार्याध्यक्षपदी बसवराज पाटील यांची निवड तर जिल्हा उपाध्यक्षपदी तानाजी काकडे यांची निवड करण्यात आली आहे.


सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे व कार्यकारी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी शुक्रवारी सोलापूरात मंगळवेढा शहर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महत्वाच्या निवडी जाहीर करून


नूतन पदाधिकाऱ्यांना लतिफ तांबोळी, राजेंद्र हजारे, मानाजीबापू माने, राहुल शहा, रामेश्वर मासाळ आदी मान्यवरांच्याउपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.


यावेळी जिल्हा सरचिटणीस भारत बेदरे, जिल्हा सहसचिवपदी मुझम्मिल काझी, जिल्हा उपाध्यक्षपदी तानाजी आप्पा काकडे, तालुका कार्याध्यक्षपदी बसवराज रामनगोंडा पाटील, शहर कार्याध्यक्षपदी नागन्नाथ दगडू राऊत आदि पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांनी त्या नाराजीत लक्ष घालून पदाधिकारी निवडी जाहीर केल्या आहेत. मात्र, त्यातही जुन्याच पदाधिकाऱ्यांच्या हाती नवी जबाबदारी देत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीची सुत्रे पुन्हा त्याच लोकांच्या हाती देण्यात आली आहे.


नवे पदाधिकारी जनतेमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कसे प्रयत्न करतात, यावर पक्षाचे पुढील भवितव्य अवलंबून आहे.


राष्ट्रवादीचे मंगळवेढ्याचे नवे पदाधिकारी पुढीलप्रमाणे :


भारत बेदरे-जिल्हा सरचिटणीस, मुझम्मिल काझी- जिल्हा सहसचिव, पी. बी. पाटील- तालुकाध्यक्ष, चंद्रशेखर कोंडुभैरी- शहराध्यक्ष, बसवराज रामगोंडा पाटील- तालुका कार्याध्यक्ष, नागन्नाथ राऊत- शहर कार्याध्यक्ष, तानाजी काकडे- जिल्हा उपाध्यक्ष आदी.

Pages