केसरी शक्ती नवरात्र महोत्सव मंडळाचा वतीने रक्तदान शिबीर संपन्न ,81 रक्तदात्यांनी केले रक्तदान - Pantnagari Times

Breaking News

Sunday, October 10, 2021

केसरी शक्ती नवरात्र महोत्सव मंडळाचा वतीने रक्तदान शिबीर संपन्न ,81 रक्तदात्यांनी केले रक्तदान

‌ 
वैराग/मुजम्मिल कौठाळकर

  51 वर्षाची परंपरा असलेले केसरी शक्ती नवरात्र महोत्सव मंडळ कासार गल्ली वैराग येथे आज रविवार रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सोशल डिस्टन्स आणि मास्कचा वापर करत 81 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनासारख्या भयंकर महामारीमुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे या रक्तदान शिबिरात 81 हुन आधिक जणांनी सहभाग घेऊन रक्तदान केले.
  वैराग पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी डॉ.चौधरी, डॉ.साळवे, डॉ. गोवर्धन, डॉ.दासरी, डॉ.कुंभार, मेजर जगन्नाथ आदमाने उपस्थित होते.
 रक्तदान शिबीर पार पाडण्यासाठी केशरी शक्ती नवरात्र महोत्सव मंडळाचे सुनील गवळी, आमोल कासार, महेश कासार, सचिन कासार, सुधीर गवळी, प्रशांत दीक्षित, बाळासाहेब कासार, सचिन रणदिवे, प्रकाश कासार, बंटी रणदिवे, बालाजी गवळी, मनोज दीक्षित, जयदीप गवळी, ओंकार गवळी, शाहू पवार, सुधीर मस्के, धनंजय माने, प्रीतम रणदिवे, नितीन रणदिवे, श्रेणिक खांटेर, तसेच केसरी शक्ती नवरात्र महोत्सव मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

Pages