वैराग येथे खतना कॅम्प ला उत्तम प्रतिसाद 100 पेक्षा जास्त बालकांची झाली धार्मिक पद्धतीने खतना
वैराग येथील जश्ने ईद -ए -मिलादुन्नबी निमित्त वैराग येथे दर वर्षी प्रमाणे यंदाही संजय नगर,इंदिरा नगर च्या वतीने खतना कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी झालेल्या खतना कॅप मध्ये मुस्लिम समाजातील 100 पेक्षा अधिक बालकांची खतना करण्यात आली.
आज वैराग शहरातील चौधरी हॉस्पिटल मध्ये घेण्यात आलेल्या खतना कॅम्प शिबिरामध्ये मौलाना वकार रजा, मौलाना कादर शेख, डॉ.आदिल चौधरी, बाबा शेख,जमीर शेख ,मौलाना आझाद विचार मंचचे जिल्हाध्यक्ष इस्माईल पटेल, पठाण सर, बाबू सय्यद ,अहेमद शेख, रहीम शेख, समीर शेख यांच्या प्रमुख उपस्थित खतना कॅम्प ला सुरुवात करण्यात आली. यावेळी सोलापूर चे प्रसिद्ध खतना स्पेशालिस्ट डॉ.हाजी नासिर सय्यद यांनी शस्त्रक्रिया केल्या असून यावेळी वैराग शहरातील व परिसरातील उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी डॉ. हाजी नासीर सय्यद बोलताना मनाली की इस्लाम धर्मात खतना ला विशेष महत्व आहे खतना करणे ही इस्लाम धर्माची प्रथा असली तरी प्रत्येक मानवाच्या निरोगी आरोग्याच्या दृष्टीने हिताची आहे हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झाले आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय नगर, इंदिरानगर ,बाबा शेख, अहमद शेख ,जमीर शेख, सैफन शेख ,बाबू सय्यद, रहीम शेख इसाक पठाण समीर शेख आदी यांनी परिश्रम घेतले.
तसेच यावेळी वैराग ग्रामीण भागातील नागरिकांना नाष्टयाची सोय करण्यात आली होती.