ग्रामसुरक्षा दलात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा : पोलीस उपनिरीक्षक शेटे मानेवाडी येथे ग्रामसुरक्षा दलाची बैठक संपन्न - Pantnagari Times

Breaking News

Monday, September 6, 2021

ग्रामसुरक्षा दलात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा : पोलीस उपनिरीक्षक शेटे मानेवाडी येथे ग्रामसुरक्षा दलाची बैठक संपन्न


 

मंगळवेढा / प्रतिनिधी 

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गावातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे पोलीस उपनिरीक्षक सौरभ शेटे यांनी सांगितले. मंगळवेढा तालुक्यातील मानेवाडी येथे ग्रामसुरक्षा यंत्रणा याबाबत ग्रामस्थांशी चर्चाविनिमय बैठकीदरम्यान बोलत होते.

      यावेळी गावातील मंदिर किंवा मोबाईल टावरवरती सायरन बसवणे, गावातील महत्त्वाच्या ठिकाणी किंवा चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे त्याचबरोबर ग्रामसुरक्षा दल सतर्क ठेवणे या विषयावर ग्रामसुरक्षा दलाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यात ग्रामसुरक्षा दलाचे काम चांगल्याप्रकारे सुरू आहे.

      गाावचे ग्रामसुरक्षा दलही अतिशय सतर्क असून आजूबाजूच्या गावात मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत असताना गावांमध्ये सद्यपरिस्थितीत कोणत्याही प्रकारच्या चोऱ्या झालेल्या नाहीत.गावच्या ग्रामसुरक्षा दलास सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गावातील नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात सहकार्य असून गावातील ग्रामसुरक्षा दलातील सदस्य गावाच्या सुरक्षेसाठी पोलिस स्टेशन  यांच्या आवाहनास सहकार्य करीत आहेत.गावातील नागरिकही त्यास चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत.

यावेळी पोलीस हवालदार राजू आवटे, माजी सरपंच गुलाब गावडे युवक नेते पोपट गावडे, नंदू गावडे, केराप्पा मेटकरी, लिंबा आमुंगे, राजू शिंदे, पांडुरंग इंगोले, संदीप खोत, उपस्थित अदी उपस्थित होते

Pages