सक्तीची वीजबिल वसुली त्वरित थांबवा, अन्यथा कार्यालय पेटवून देऊ प्रहारचा गंभीर इशारा निवेदन - Pantnagari Times

Breaking News

Saturday, September 25, 2021

सक्तीची वीजबिल वसुली त्वरित थांबवा, अन्यथा कार्यालय पेटवून देऊ प्रहारचा गंभीर इशारा निवेदन


 

सोलापूर / प्रतिनिधी


सध्या सोलापूर शहर व जिल्ह्यात महावितरणतर्फे वीज बिल भरा नाहीतर , तुमचे लाईट कनेक्शन कट करण्यात येईल,  अशी धडक मोहीम सुरू आहे. या मोहिमेला प्रहार शेतकरी संघटना व जनशक्ती पक्षाने विरोध केला असून सोलापूर शहर व जिल्ह्यातील सकतीची  वीज बिल वसुली त्वरित थांबवावी अशा मागणीचे निवेदन  महावितरणचे कार्यकारी अभियंता  यांना प्रहार तर्फे देण्यात आले..

एकीकडे covid  मुळे अनेक कारखानदार सामान्य नागरिक देशोधडीला लागले आहे,  अनेकांनी आत्महत्या सारखे पावले सुद्धा उचललेली आहे,  अशा वेळी महावितरण संपूर्ण वीज बिल भरणा संदर्भात तगादा लावत आहे,  पूर्वी पन्नास टक्के वीज बिल भरून नागरिकांच्या लाईट कनेक्शन पूर्ववत करण्यात येत होते परंतु आता शंभर टक्के पैसे भरा नाहीतर लाईट करतो अशी धमकी महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून दिली जात आहे, त्यामुळे गोरगरीब मध्यमवर्गीय लोकांची लाईट कोणत्याही परिस्थितीत कट करू नये लाईट बिल भरण्यास मदत द्यावी आणि ग्राहकांना चांगली वागणूक द्यावी नोटीस दिल्याशिवाय विद्युत कनेक्शन कट करू नये आदी मागण्या प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरणच्या कार्यकारी अभियंता आंकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे ..

कोणतीही पूर्वसूचना न देता लाईट कनेक्शन कट केल्यास किंवा लाईट कट करण्याची मोहीम न थांबल्यास आपल्या कार्यालयावर हजारोंच्या मोर्चा घेऊन येण्याचा इशारा सुद्धा प्रहारचे शहर संपर्क प्रमुख जमीर भाई शेख यांनी दिला आहे.

या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख दत्ता भाऊ मस्के पाटील , शहर प्रमुख अजित भाऊ कुलकर्णी, शहर कार्याध्यक्ष खालिद मणियार, शहर संपर्क प्रमुख जमीर भाई शेख ,जिल्हा उप प्रमुख वसीम देशमुख, हाजी सलीम मुजावर,जुबेर कमिश्नर आदी उपस्थित होते

Pages