आव्हानात्मक पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा दिलदार मित्र चाँदभैय्या शेख - Pantnagari Times

Breaking News

Sunday, September 12, 2021

आव्हानात्मक पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा दिलदार मित्र चाँदभैय्या शेख


 

( लेखक - मा.हरीभाऊ पाटील / सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस ) 


पत्रकारिता हे तसं खूप आव्हानात्मक क्षेत्र…आणि मराठी पत्रकारितेला तर दर्पण,मूकनायक,केसरी, मराठा ,पुढारी ,लोकमत ,पुण्यनगरी ,सुराज्य अशी समृद्ध परंपरा लाभली आहे. आणि जिथे अशी परंपरा येते तिथे ती टिकवण्याची जबाबदारीही…लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणाऱ्या या क्षेत्रात आजवर अनेकांनी आपला वेगळा ठसा उमटवला. सध्या प्रिंट माध्यमांपासून सुरू झालेला पत्रकारितेचा प्रवास डिजिटल मिडीयापर्यंत येऊन थांबला आहे. चाँदभैय्या शेख हे अशा एका दोन्ही माध्यमातलं नाव. सीबीएस न्युज मराठी चे ते मुख्य संपादक  म्हणून त्या कार्यरत आहेत. ही जबाबदारी त्या गेली तीन वर्षे हाताळत आहेत. वृत्तपत्र वाचनाची आवड अगदी शालेय जीवनापासूनच असणाऱ्या चाँदभैय्या यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपल्या बातमीदारीतून वेगळा ठसा उमटवला. लक्षवेधी बातमीदारीकरिता त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गेली १४ वर्षे ते या क्षेत्रात कार्यरत आहेत.

त्यांची पत्रकारिता २००७ साली दैनिक सांगोला न्युज या वर्तमानपत्रापासून सुरवात झाली 

पत्रकारितेत करिअर करण्याचा निश्चय तर होता, परंतु घरातील सामाजिक  वातावरणामुळे ते अधिकच दृढ झाला.पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात ते भरारी घेत आहेत. प्रश्न पडणे आणि त्यांचे उत्तर शोधणे हा बातमीदारीचा गाभा. त्यानंतर बातमीदाराला गवसलेले मोजक्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत पोहोचविणे हा दुसरा टप्पा. या दोन्हीत हातोटी असल्याने चाँदभैय्या यांचा पत्रकारितेतला प्रवास सोपा झाला.आजवर त्यांनी विविध जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय वर्तमानपत्रात निर्भीड पणे काम केले आहे .आता देखील सीबीएस न्युज मराठी चे स्वतः मालक व संपादक असून देखील  बातम्या जमा करणे आणि संपूर्ण बातमी तयार करून घेणे अशी दुहेरी जबाबदारी त्यांनी हाताळली. बातमीदारी त्या आधीही करत होते. पण सीबीएस न्युज मराठी ने  करिअरला कलाटणी मिळाली. सध्याच्या काळात अत्यंत दुर्लभ असलेले बातमीदारीचे स्वातंत्र्य त्यांनी येथे अनुभवले. शिक्षण , शेती ,अवैध धंदे व प्रशासकीय यंत्रणेच्या विरोधातील  त्यांच्या अनेक बातम्या गाजल्या. एका बातमीदाराला आणखी काय हवे असते… महाराष्ट्रातील डिजिटल मिडियातील क्रमांक एक वर असलेल्या सीबीएस न्युज मराठीच्या प्रमुखाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे .मात्र त्यांच्या वागण्यातून हे कधी हि दिसून येत नाही. विशेषतः एक दोन महिने गेले कि ,चाँदभैय्या ला कोणत्या तरी संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा पुरस्कार मिळालेला आहे आशा बातम्या येतात . आतापर्यंत अनेक पदे कितीतरी पुरस्कार मिळाले मात्र हा माणूस १४ वर्षांपूर्वी होता तसाच आहे .बदल अजिबात झाला नाही त्यामुळे तर महाराष्ट्रात प्रत्येक भागात मित्र मैत्रीण व प्रतिनिधी आहेतच .हे सुचविताना पत्रकार कसा असावा, याविषयीही चाँदभैय्या नकळतपणे सांगून जातात. पत्रकारांनी भरभरून जगावं, असे त्यांना वाटते. अवांतर वाचनाबरोबरच नाटक, संगीत, पर्यटन, खेळ या जीवनातील प्रत्येक गोष्टींचा त्यांनी समरसून आनंद घेतला पाहिजे. या सगळ्याचा पत्रकारितेला नकळत फायदा होत असतो, अशी त्यांची भावना आहे. केवळ पत्रकारितेच नव्हे तर कुठल्याही क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱया तरूणींनी मानसिक-भावनिकदृष्ट्या अत्यंत सक्षम होण्याची गरज त्यांना वाटते. त्यासाठी विविध छंद, आवडीनिवडी जपाव्या. या जोडीला नियमित व्यायाम किंवा एखाद्या खेळाची आवड जोपासण्याचा सल्ला त्या देतात. आनंदी मन आणि सुदृढ शरीर यांचा आपली कामगिरी उंचावण्यासाठी निश्चितच फायदा होतो, यावर भैय्या  सांगतात. भैय्या  यांच्या कारकिर्दीत त्यांच्या कुटुंबियांचाही खूप मोठा वाटा आहे. सर्व बहिण भाऊ / काका - काकी यांचे प्रत्येक वेळी सहकार्य मिळत असते . विशेषतः  त्यांची पती सौ.रेश्मा  यांचे पाठबळ त्यांच्यामागे नेहमीच राहिले.पत्रकारिता हे क्षेत्र असे की एकदा सकाळी घरातून बाहेर पडले की घरी कधी परतू, याची खात्री नाही. अशा या क्षेत्रात घराची जबाबदारी त्यांची पत्नी योग्य रीत्या पार पाडत आहेत .सर्वात महत्वाचे म्हणजे चाँदभैय्या सतत त्यांच्या सीबीएस न्युज मराठी च्या प्रतिनिधी चे कौतुक करताना दिसून येतात .

------------------------------------------------------------

*समाजातील अन्यायग्रस्त, पीडीतांचा निर्भीड आवाज चाँदभैय्या शेख*


( लेखन - किसनराव गायकवाड / जेष्ठ नेते )


सांगोला तालूक्यात पारे या गावात कै. बाबालाल शेख आणि कै.राशदबी यांच्या  पोटी १३सप्टेंबर ला चाँदभैय्या शेख यांचा जन्म झाला. लहाणपणापासूनच कुशाग्रबुध्दीमत्ता लाभलेल्या आपल्या मूलाने खुप शिकावे ही त्यांच्या आईवडिलांची प्रबळ इच्छा होती. घरातील परिस्थितीचा अंदाजा आल्यावर आपणही काहीतरी करुन घरखर्चासाठी हातभार लावावा या उद्देशाने चाँदभैय्या यांनी प्रथम रोजगार हमीची काम केले .कोणत्याही कामाची लाज न बाळगता आपले ध्येय सिध्द कसे करावे हे त्यांनी आपल्या कृतितून सिध्द केले.रोजगार हमीच्या कामावर येणारे मुकादम वाचण्यासाठी पेपर घेऊन येत तो पेपर भैय्या वाचत असतं त्यांना त्या ठिकाणी वाचनाचा छंद जडला. यातून अनेक दिग्गज व्यक्तींची ओळख झाली. त्यामूळेच पत्रकारीतेचे क्षेत्र त्यांना खुणावू लागले. आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे याचा मार्ग सापडला, म्हणूनच अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत त्यांचे शिक्षण झाले. आयुष्यात संकट ही येतात आणि जातात. त्यावर संयमाने मात करण्याच सामर्थ्य त्यांना आई वडिलांच्या प्रेरणेमूळेच मिळाले. म्हणूनच जीवनात आलेल्या चढ उतारावर धैर्याने मात करत आज ते पत्रकारिता क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत तरुणांपूढे एक निर्भीड व आदर्श पत्रकार ,संपादक  आदर्श व्यक्तीमत्व ठरले आहेत. अनेक वृत्तपत्रातून अनुभवसंपन्नतेची शिदोरी घेत आज ते डिजिटल मिडिया मध्ये अग्रस्थानी असलेल्या सीबीएस न्युज मराठी नेटवर्क चे मुख्य संपादक” म्हणून कार्यरत आहेत.


महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाची बूज राखत, सडेतोड आणि वृत्तपत्रीय  डिजिटल मिडिया क्षेत्रात सत्याची कास धरुन आपले ध्येय साकारत कर्तव्य पार पाडणारा सच्चा पत्रकार म्हणून श्री.चाँदभैय्या शेख यांचे नाव आग्रस्थानी आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यासंगी, ध्येयनिष्ठ व्यक्तिमत्व आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे. पत्रकारिता करतांना ते प्रवाहाच्या बाजूने न वाहवत जाता, निर्भीडपणे सद्सत विवेक बुध्दी जागृत ठेवून समाजातील अन्यायग्रस्त, पीडीतांचा ते निर्भीड आवाज झाले आहेत. चाँदभैय्याजींनी पत्रकारितेला हत्यार नसून एक सामाजिक चळवळ बनवली आहे. प्रथम २०१० मध्ये त्यांना स्वाभिमानी पत्रकार  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.आज अखेर विविध प्रकारचे ८९ पुरस्कार मिळाले आहेत .तर कोरोना च्या पार्श्वभूमीवर चाँदभैय्यांना जवळपास १३० संस्थेकडून कोवीड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. आता पर्यंत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ ,अखिल भारतीय पत्रकार संघटना ,अखिल भारतीय काँग्रेस पक्ष ,  माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व राष्ट्रीय किसान ब्रिगेड , कामगार व कर्मचारी युनियन अशा विविध सामाजिक व राजकीय संघटनेत तालुका ,जिल्हा व राज्यस्तरीय पदावर काम करीत आहेत. हा त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा. खरे तर त्यांचे कार्य शब्दात व्यक्त करता येणार नाही, एवढे व्यापक आणि महान आहे. विशेषतः सीबीएस न्युज मराठी च्या दोन्ही वर्धापनदिनानिमित्त राज्यातील विविध क्षेत्रातील १६० मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित केले होते .आपल्या भारतात कोरोना काळात सर्व जनजीवन विस्कळीत झाले होते. सर्वजन घरात बसून असतांना चाँदभैय्या यांच्यातला जागृत पत्रकार मात्र आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाज जनजागृती करत होता. सर्वसामान्य लोकांना अन्नधान्य वाटफ करीत होता  प्रशासनाच्या सुविधांच्या आभावावर प्रहार करत होता सर्वात महत्त्वाचे म्हणजे सीबीएस न्युज च्या माध्यमातून गेल्या वर्षी आणि चालू वर्षी विविध क्षेत्रातील सुमारे १२०० लोकांना कोवीड योध्दा म्हणून आँलाईन पद्धतीने सन्मानित केले आहे . सामाजिक बांधिलकीतुन ते आजही इतरांच्या मदतीला धावून जातात. १३ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस. सुख, समृध्दी आणि आरोग्याने परिपुर्ण व्हावा… मनातील साऱ्या आशा, आकांक्षा साकार व्हाव्यात. एवढीच मंगल कामना… माझ्या कडून वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..!


--------------------------------------------


*कल्पवृक्षापरी पप्पा..... तुमचे व्यक्तिमत्व - (आदरणीय चाॅंदभैय्या शेख*)समाजाचा आरसा तुम्ही

पत्रकारितेचा वारसा तुम्ही

युवकांचे प्रेरणास्थान तुम्ही

धनुष्याचा बान तुम्ही

परिस्थितीवर स्वार झालात तुम्ही

पत्रकारितेत नवा इतिहास घडविला तुम्ही


तुमचे शब्द जसे महाकाव्य तुमच्या पाया जवळ गळून पडावीत

शब्दांचा वार तुमचा जणू गरुड झेप घ्यावीत

तुमच्या डरकाळीने हादरलं  सारं आकाश

बघता बघता सीबीएस न्यूज असा पडला प्रकाश


कल्पवृक्षा परी पप्पा तुमचे व्यक्तिमत्व

परिश्रम परमार्थ एकमेव व तत्व

सीबीएस न्यूज च्या नावाने केलेले तुम्ही व्यक्त

लेखणीचा वार हेचं तुमचे जिवनसत्व


लेखणीच्या जोरावर न्याय मिळवून देता निस्वार्थी प्रमाणे

गोडकौतूक आमचे पुरवले लाडाने 

व्यस्त असता जेव्हा ..कामाच्या व्यापापायी

वेळ अपुरा आम्हासाठी ..ही खंत रुदयाठायीरोज नवा दिवस उगवितो ..तुमच्या हसतमुखाने 

तुमचे अनुभव किस्से ..भरती ओंजळ सुखाने कौतुकाची थाप मजला वाटे अनुमाप थेट

ह्या पिल्लांचे घरटे पप्पा रूदयात तुमच्या ग्रेट


पूर्ण व्हाव्यात सर्व तुमच्या इच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

                         

                                 अभिचिंतक

                             कु.रशिदा चाॅंद शेख

Pages