मंगळवेढा / प्रतिनिधी
हुन्नूर ता. मंगळवेढा येथे नामदेव गणपत रेवे यांच्या महालिंगराया मेडिकल अँड जनरल स्टोअर्स चे उद्घाटन डॉ.वाय.एस.कराडे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात करण्यात आले.
यावेळी रेवेवाडीचे माजी सरपंच जगन्नाथ रेवे, हुन्नूर चे सरपंच मच्छिंद्र खताळ, बिरोबा देवस्थान कमिटी चे अध्यक्ष राजाराम पुजारी, रेवेवाडीचे सरपंच ब्रह्मदेव रेवे,रासपचे जिल्हाध्यक्ष आबा मोटे,महमदाबादचे माजी सरपंच काकासो मिसकर, पडोळकरवाडी चे माजी सरपंच शिवाजी वाघमोडे,रेवेवाडीचे उपसरपंच धनंजय चौगुले,दत्ता लवटे,पोलीस पाटील नामदेव रेवे, संतोष शिरसागर, मच्छिंद्र पुजारी, सिद्धू वाघमोडे, प्रशांत काशीद,आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.