पोलीस हवलदार लक्ष्मण साळुंखे केंद्रीय राखीव पोलिस दलातून सेवानिवृत्त - Pantnagari Times

Breaking News

Thursday, September 2, 2021

पोलीस हवलदार लक्ष्मण साळुंखे केंद्रीय राखीव पोलिस दलातून सेवानिवृत्त


 

मंगळवेढा / प्रतिनिधी


हुन्नूर ता. मंगळवेढा येथील लक्ष्मण नारायण साळुंखे 31 ऑगस्ट रोजी  बावीस वर्षे सहा महिने देश सेवा करून  केंद्रीय राखीव पोलीस हवलदार पदावर असताना नियत वयोमानानुसार निवृत्त झाले

हुन्नूर गावातील केंद्रीय राखीव पोलीस  दलामध्ये पोलीस हवलदार पदावर निवृत्ती झालेली एकमेव व्यक्ती आहेत


घरची परिस्थिती अत्यंत बेताची असताना 1999 मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झाले पोलीस पदापासून सुरू झालेला प्रवास कामाची व कार्याची दखल घेत 2015 साली पोलीस हवालदार म्हणून बढती देऊन सन्मान केला

नागालँड,जम्मू /काश्मीर, आसाम, झारखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र,आणि छत्तीसगड, या ठिकाणी उत्कृष्ट अशी देशसेवा बजावली आहे.उज्वल देशभक्ती सकारात्मक विचार शिस्त आजही त्यांच्या बोलण्यात दिसून येतो. तरुणांना आजही ते मार्गदर्शन करत असतात पोलीस दलातील वेगवेगळ्या व महत्त्वाच्या मोहिमेत साळुंखे यांचा सहभाग होता. 

 कुटुंबापासून बराच वेळा दूर राहून लक्ष्मण साळुंखे यांनी केली देश सेवा इतरांना प्रेरणादायी आहे

विशाल पाटेदार कमांनडेट, सुरेश कुमार सब सुभेदार मेजर यांनी प्रशस्तीपत्र देऊन पोलीस हवालदार लक्ष्मण साळुंखे यांचे अभिनंदन केले

Pages