वैराग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे 30 खाटांच्या क्षमतेचे ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करणेस मंजुरी मिळावी – खासदार ओमराजे निंबाळकर - Pantnagari Times

Breaking News

Saturday, September 25, 2021

वैराग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे 30 खाटांच्या क्षमतेचे ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करणेस मंजुरी मिळावी – खासदार ओमराजे निंबाळकर


 

वैराग / मुजम्मिल कौठाळकर


२३ सप्टेंबर रोजी मा.मुख्यमंत्री साहेब यांचे शासकीय वर्षा निवासस्थानी मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे साहेब यांची उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भेट घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्राचे 30 खाटांच्या क्षमतेचे ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन घेण्याबाबत विनंती केली. याबाबत सकारात्मक चर्चा झाली.


उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील वैराग ता.बार्शी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सन 2011 च्या लोकसंख्येवर आधारित बृहद आराखड्यात समावेश करुन त्याचे श्रेणीवर्धन करुन 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय करणे आवश्यक आहे. तसेच वैराग हे नगरपंचायत चे ठिकाण असुन येथील नागरिकांनी उपचारासाठी सोलापूर अथवा बार्शी येथे जावे लागत असुन दोन्ही ठिकाणी रुग्णांच्या उपचारासाठी गैरसोयीची असुन ग्रामीण रुग्णालय झाल्यास याचा लाभ येथिल नागरिकांना होणार आहे.

Pages