वैराग पोलिसांनी अवघ्या बारा तासात सव्वाचार लाखांच्या मशिनरी चोरीचा लावला छडा - Pantnagari Times

Breaking News

Saturday, August 7, 2021

वैराग पोलिसांनी अवघ्या बारा तासात सव्वाचार लाखांच्या मशिनरी चोरीचा लावला छडा


 

वैराग -मुजम्मिल कौठाळकर


रातंजन (ता. बार्शी) येथे झालेल्या सुमारे सव्वाचार लाखांच्या साहित्य चोरीचा छडा वैराग पोलिसांनी अवघ्या बारा तासात लावला यातील तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून यातून आणखीही चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे

 रातंजन (ता.बार्शी )येथील साहेबराव देशमुख यांच्या बंद असलेल्या गुळ कारखान्यातून सोमवारी पहाटे 2 लाख 59 हजार किमतीच्या साहित्यांची चोरी झाल्याची फिर्याद वैराग पोलिसांना दिली होती.

याच्यासह किशोर आनंदराव देशमुख (रा.वैराग) यांच्या मालकीच्या खडी क्रेशरमधून 1 लाख 55 हजार रुपयांच्या किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. त्यानंतर 4 लाख 14 हजार रुपये साहित्य चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला .

पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते ,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनय बहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, पोलीस अंमलदार पंडित गवळी, शिवाजी मुंडे, सुनील मारकड, तानाजी लोकरे यांच्या पथकाने गोपनीय बातमीदारामार्फत माहिती कडून तपासाची चक्रे फिरवली. अवघ्या बारा तासांत गुन्ह्यातील तीन आरोपींना ताब्यात घेण्यात वैराग पोलिसांना यश आले. या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या सर्व माल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून अटक आरोपींना बार्शी न्यायालयात पोलीस कोठडी दिली आहे. तिघा आरोपींना वैराग पोलिसांनी ताब्यात घेतले असून तरी आणखी आरोपींचा शोध घेण्यासाठी या तीन आरोपींचे नावे जाहीर करण्यात आलेली नाही

Pages