विद्यामंदीरच्या आठ संचालकांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, बनावट दाखला प्रकरण - Pantnagari Times

Breaking News

Saturday, August 21, 2021

विद्यामंदीरच्या आठ संचालकांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, बनावट दाखला प्रकरण


 

वैराग -मुजम्मिल कौठाळकर


वैराग येथील विद्यामंदीर संस्थेच्या संचालकांनी बनावट दाखल्याच्या आधारे 

चार सदस्यांच्या जाती बदलून अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र मिळावीत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आठ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज बार्शी सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. अशी माहीती तक्रारदार अरुण सावंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली......१९५४ साली  स्थापन झालेल्या  विद्या मंदीर या संस्थेचे सभासद हे सर्व  जातीधर्मीय होते. मात्र अल्पसंख्यांकाकडून चालविण्यात येणार्‍या शैक्षणिक  संस्थांना शासनाच्या हस्तक्षेपाविना नोकर भरतीचे  पुर्ण  अधिकार  आहेत. अल्पसंख्याक  दर्जा  मिळविण्यासाठी संस्थेच्या एकूण सभासदांपैकी किमान ५० टक्के  सदस्य हे  भाषिक अथवा धार्मिक अल्पसंख्याक असणे आवश्यक असते. हे लक्षात  घेवून मयत झालेल्या सभासदांचा चेंज रिपोर्ट दाखल करताना संचालकांनी संगनमताने  भानुदास गोंविद गोवर्धन, नरसिंह दत्तात्रय पिंपरकर, रामचंद्र शंकर बंड हे ब्राम्हण जातीचे व दिंगबर रामराव मोहिते मराठा जातीचे असताना  ते जैन या अल्पसंख्याक  जातीचे  असल्याचे शाळेचे खोटे  दाखले  तयार करुन  त्याआधारे  संस्थेस अल्पसंख्याकाचा दर्जा मिळविला. यातून शासनाची

फसवणूक केल्याप्रकरणी

वैराग ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अरुण भगवान सावंत यांनी दिलेल्या  खाजगी फिर्यादीवर न्यायालयाने  दिलेल्या आदेशानंतर भादंवि कलम ४२०,४६७,४६८,४७१,३४, अन्वये  हा गुन्हा  दाखल झाला आहे. या प्रकरणी १) अनिरुध्द कृष्णा झालटे वय-७८ वर्ष, वैराग  २) मृणाल जयंत भुमकर वय-५६ वर्ष, वैराग  ३) भुषण जयंत भुमकर वय- ४८ वर्ष, वैराग  ४) प्रेरणा मृणाल भुमकर वय-५२ वर्ष, गल्ली वैराग ५) लीना भुषण भुमकर वय-५० वर्ष, वैराग  ६) जयश्री एकनाथ सोपल वय-६५ वर्ष, वैराग  ७) विजयकुमार रघुनाथ बंडेवार वय-७० वर्ष, वैराग र ८) सुवर्णा जयंत भुमकर वय-७५ वर्ष वैराग ता-बार्शी अशी यातील संशयितांची नावे आहेत. यातील एक संशयित संस्थेचे अध्यक्ष जयंत धन्यकुमार भूमकर यांचे काही  दिवसांपुर्वीच  निधन झाले आहे. यातील संशयितांचा १८ ऑगष्ट रोजी बार्शी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यामध्ये सरकार तर्फे अॅड पी.ए. बोचरे , मूळ फिर्यादीच्या वतीने ऍड आर यू वैद्य, ऍड के पी राऊत यांनी काम पाहिले....

[ आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून २६ ऑगष्टपर्यंत आठ दिवसांची मुदत आहे. त्यामुळे अपिल करण्यासाठी उच्च न्यायालयात जाणार आहोत.....भूषण भूमकर..... अध्यक्ष ... विद्या मंदीर संस्था. वैराग ]

Pages