वैरागमध्ये नियमांचे पालन करत मुस्लिम बांधवांनी मोहरम साजरा केला. - Pantnagari Times

Breaking News

Friday, August 20, 2021

वैरागमध्ये नियमांचे पालन करत मुस्लिम बांधवांनी मोहरम साजरा केला.


 

वैराग / मुजम्मिल कौठाळकर 


वैरागमध्ये कोरोनाबाबत सरकारने केलेल्या नियमांचे पालन करत मुस्लिम बांधवांनी मोहरम साजरा केला. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने केलेल्या नियमावलीचे पालन करत मिरवणूक न काढता वैराग येथे मुस्लिम बांधवांनी मोहरमच्या सवाऱ्यांचे जागेवरच विसर्जन केले. इंदिरानगर नाले हैदर येथे यांच्या सवाऱ्यांची स्थापना झाली होती. त्याच जागेवरच या सवाऱ्यांचे विसर्जन करण्यात आले. 


वैरागमध्ये मोहरमनिमित्त मोठी विसर्जन मिरवणूक काढली जाते. मात्र याहीवर्षी कोरोना व्हायरसमुळे विसर्जन मिरवणुकीबाबत निर्बंध घालण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी सर्व नियमांचे पालन करीत वैरागमध्ये सवाऱ्यांचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. इंदिरानगर नाले हैदर ठिकाणी अतिशय शांतता आणि धार्मिक वातावरणात सवाऱ्यांचे विसर्जन करण्यात आले. सवारी विसर्जनासाठी मोजक्याच भाविकांची नियुक्ती करण्यात आली होती.

 हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेले इंदिरानगर नाले हैदर सवाऱ्यांचे आयोजकांनी वैरागचे पोलीस निरीक्षक विनय बहिर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड साहेब, सचिन मुंडे, गवळी साहेब दादासाहेब खेंदाड होमगार्ड यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.

 यावेळी मौलाना आझाद विचार मंचाचे जिल्हा अध्यक्ष इस्माईल पटेल,  विलास लोहार ,बाबासाहेब शेख, बालाजी शिंदे, आसिफ शेख ,रहीम शेख, शाहिद शेख, अल्ताफ शेख, सावता माळी, दत्ता लोहार राजेंद्र ,अमर शेख ,अण्णा वाघ, विजू माळी, सादिक शेख, समीर शेख, मुज्जू पटवेकर, मोहन पवार, बालाजी मोरे ,सतीश वाघ आमीन शेख, इतर मानकरी उपस्थित होते

Pages