कासार जैन समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शांतीनाथ विभूते यांचे निधन - Pantnagari Times

Breaking News

Saturday, August 14, 2021

कासार जैन समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शांतीनाथ विभूते यांचे निधन


 

वैराग / प्रतिनिधी

 मुंगशी ( वा ) ता. बार्शी येथील कासार जैन समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते शांतीनाथ बाबुराव विभूते यांचे अल्प आजाराने निधन झाले. ते 87 वर्षाचे होते. येथील श्री. प.पू ब्रम्हमहती महाराज सार्वजनिक वाचनालयाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात तीन विवाहीत मुली, एक भाऊ, नातवंडे,पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वैराग येथील सकाळ बातमीदार कुलभूषण विभूते यांचे ते वडील होत. मुंगशी येथे त्यांच्यावर अंत्पसंस्कार करण्यात आले.

Pages