जागतिक फोटोग्राफी दिवसाच्या निमित्ताने बार्शी फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोशिएशन यांच्या वतीने सर्व फोटोग्राफर बंधूंच्या उपस्थिती मध्ये साजरा करण्यात आला - Pantnagari Times

Breaking News

Friday, August 20, 2021

जागतिक फोटोग्राफी दिवसाच्या निमित्ताने बार्शी फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोशिएशन यांच्या वतीने सर्व फोटोग्राफर बंधूंच्या उपस्थिती मध्ये साजरा करण्यात आला


 

वैराग-मुजम्मिल कौठाळकर


जागतिक फोटोग्राफी दिवसाच्या निमित्ताने हा दिवस बार्शी फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोशिएशन यांच्या वतीने सर्व फोटोग्राफर बंधूंच्या उपस्थिती मध्ये  साजरा करण्यात आला.व यावेळी सध्या कोव्हीड ची परिस्थिती बघता फोटोग्राफर बंधूंसाठी व त्यांच्या परिवारासाठी भविष्यात केव्हाही (पॅथॉलॉजी)रक्ताच्या व लघवीच्या सर्व तपासणी ची गरज भासल्यास तेथील तपासणी च्या खर्चाची 40% रक्कम व शुगर तपासणी चे पूर्ण 100%रक्कम असोशिएशन मदत करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.  व याचा लाभ सर्वानी घ्यावा असे आव्हान असोसिएशन अध्यक्ष जमीर कुरेशी यांनी केले.सदरच्या कार्यक्रमाला उपस्थित उपाध्यक्ष वैभव कांबळे, सचिव राम नवले, सहसचिव अभिषेक राऊत, खजिनदार रोहित दिक्षित,सदस्य मोहम्मद शेख, ओवेस सौदागर, विशाल गाढे, रुपेश भडकवाड, रामचंद्र यादव,सुनील यादव, साहिल झवेरी, आनंद गरड, जय गुरु गिरी, व आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला

Pages