वैराग नगरपंचायतींच्या सर्वांगीण विकास कामासाठी 10कोटी निधी मिळावा - सुनील पवार - Pantnagari Times

Breaking News

Sunday, August 22, 2021

वैराग नगरपंचायतींच्या सर्वांगीण विकास कामासाठी 10कोटी निधी मिळावा - सुनील पवार


 

वैराग -मुजम्मिल कौठाळकर


सोलापूर जिल्ह्यातील नव्याने स्थापन झालेल्या नगर पंचायतीस मान्यता दिली त्या बद्दल प्रथम वैराग ग्रामस्थाच्या वतीने मा.मुख्यमंञी उध्दव ठाकरे साहेब यांचे आभार सोलापूर जिल्ह्यातील वैराग ही नगरपंचायत नव्याने स्थापन झालेलीआसुन आपण शासनाच्या ठोक तरतुदी मधुन वैराग नगर पंचायतीस १० कोटीचा विकास निधी उपलब्ध करुन द्यावा वैराग नगरपंचायत हि बार्शी तालुक्यातील सर्वात मोठी बाजार पेठ असुन लोकसंख्येच्या मानाने मोठे गाव आहे लोकसंख्येने मोठ्या असलेल्या या गावाचा या भागातील ५७ गावाशी मोठ्या प्रमाणात आवक जावक व दळणवळणाचा मोठा संपर्क आहे त्यामुळे नागरिक शेतकरी व लहान लहान व्यवसायिकांचा सतत संपर्क आसतो नगरपंचायतीस रस्ते व इतर सोई सुविधा व नागरी सुविधा साठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे या नागरी सुविधा साठी मोठ्या निधी ची गरज आहे यानिधीसाठी आपण स्वतः जातीने लक्ष घालून राज्याचे नगरविकास मंञी मा. एकनाथ शिंदे यांचे कार्यालया कडून आपण सुचना देऊन विकास निधी उपलब्ध करुन मंजुर करुन द्यावी अशी मागणी वैराग येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील आबा पवार यांनी राज्याचे मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदना व्दारे विनंती केली आहे

Pages