महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटना उस्मानाबाद तालुका अध्यक्षपदी हैदर शमशोद्दीन पटेल यांची निवड. - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, July 21, 2021

महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटना उस्मानाबाद तालुका अध्यक्षपदी हैदर शमशोद्दीन पटेल यांची निवड.


 

वैराग - मुजम्मिल कौठाळकर


       महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेच्या उस्मानाबाद तालुका अध्यक्ष पदी हैदर शमशोद्दीन पटेल यांची तसेच शोहेब पटेल येडशी शहर अध्यक्ष पदी निवड मा. नदीम भाई मुजावर संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट यांच्या हस्ते करण्यात आली. 

     येडशी येथिल समाजसेवक हैदर पटेल नेहमी सामाजिक कार्यामध्ये  अग्रेसर असल्याने त्यांच्या सामाजिक कार्याची व सामाजिक जन जागृतीची  संघटनेच्या वतीने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची नियुक्ति करण्यात आली. 

    तसेच भविष्यात संघटनेच्या माध्यमातून समाजाची सेवा करावी व तसेच संघटनेच्या माध्यमातून गोरगरीबांना सहकार्य करुन समाजाचे विविध समस्याचे निवारण करावे व संघटन बळकट करावे असे संघटनेच्या वतीने त्याना सांगण्यात आले. व तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. 

      यावेळी आसिफ जमादार मराठवाडा अध्यक्ष मुस्लिम फ्रंट, नाहीद मुजावर महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष, रईस मुजावर महाराष्ट्र राज्य उप अध्यक्ष, तय्यब मुजावर, अनवर बागवान बार्शी तालुका अध्यक्ष, राजु पठाण भोनगिरी ग्रामपंचायत सदस्य , आकलेस जमादार आदी उपस्थित होते.

Pages