स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी अध्यक्ष सौरभ राजू शेट्टी यांची बार्शी तालुका दौरा, वैराग येथे संतोष निंबाळकर यांच्या निवासस्थानी सच्चीदा भेट - Pantnagari Times

Breaking News

Monday, July 26, 2021

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी अध्यक्ष सौरभ राजू शेट्टी यांची बार्शी तालुका दौरा, वैराग येथे संतोष निंबाळकर यांच्या निवासस्थानी सच्चीदा भेट


 

वैराग:-मुजम्मिल कौठाळकर


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांचे चिरंजीव सौरभ राजू शेट्टी महाराष्ट्र राज्य युवा आघाडी अध्यक्ष बार्शी तालुका दोरा दरम्यान रोजगार हमी योजनेचे जनक माजी  आमदार स्व. चंद्रकांत निंबाळकर यांच्या निवासस्थानी आज रोज (दि. 26 )वैराग भागांचे नेते संतोष दादा निंबाळकर यांची सदिच्छा भेट दिली.

  यावेळी संतोष (दादा)निंबाळकर यांच्या परिवाराच्या वतीने सौरभ राजू शेट्टी यांच्या सत्कार प्रगतशील शेतकरी नेताजी डिसले च्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी आमच्या प्रतिनिधीशी सौरभ शेट्टी म्हणाले की  शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत त्यांचे पहिले स्वागत करतो पण अशा ठिकाणी प्रश्न अनेक आहेत पण त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी प्रत्येक विषयाच्या मागं शेतकऱ्यांची संख्या दिसण्याला महत्त्व आहे आणखी चळवळीमध्ये आणि लोकशाही मध्ये काम करत असताना तुमच्या डोक्यात विचार किती आहे याचा विचार एका विचारांच्या तो किती महत्वाचा आहे त्यासाठी एखादा विचार घेऊन संघटनेचा कार्यकर्ता संघटनेचे पदाधिकारी जर काम करत असतील तर त्यांच्या विचारांच्या मागे किती महत्वाचा आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने आपण पार्श्वभूमी बघितली तर अनेक दिग्गज नेते हा सोलापूर जिल्ह्यातील तयार झालेले आहेत त्यामुळे त्यांच्या माध्यमातून तर सर्वसामान्यांच्या मनामध्ये त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची गाठीभेटी घेऊन शेतकऱ्यांच्या पोरांची गाठीभेटी घेऊन त्यांना हा अर्थसंकल्प संदर्भात चर्चा करून त्यांना आपली शेती नेमके चुकते कुठे आणि आपण कुठल्या पद्धतीने शेती मध्ये मार्ग चर्चा करून पुनर्रचना आम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये करायचे आहे आणि यशस्वी होणार आहे विश्वास आहे आणि त्या वेळेस एक चांगलं आणि ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी तालुक्यामध्ये त्यावेळेस स्वाभिमानी च्या माध्यमातून एक हि शेतकरी वर अन्याय होऊ देणार नाही. असे सांगितले


यावेळी वैराग भागाचे नेते संतोष (दादा)निंबाळकर, शाहूराजे निंबाळकर, रानोजी निंबाळकर भालचन्द्र मोरे(सर), सोमनाथ पालकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष हनुमंत कापसे, देवा पौळ, हनुमंत जगदाळे,  वैराग भागातील शेतकरी व इतर उपस्थित होते

Pages