वैराग / मुजम्मिल कौठाळकर
आगामी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत आणि बार्शी तालुक्यात राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकावर रहावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आढावा बैठक घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे नेते निरंजन भूमकर यांच्या नेतृत्वाखाली ही आढावा बैठक विद्या मंदिर हायस्कूल वैराग येथे पार पडली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. मागील २ वर्षांत शहरात राष्ट्रवादीमार्फत करण्यात आलेले काम हे कौतुकास्पद आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता २ वर्षांत शहरात राष्ट्रवादीची ताकद अजून वाढेल, असा विश्वास निरंजन भूमकर यांनी व्यक्त केला.
यावेळी शहराध्यक्ष अमोल आंधळकर, तालुका कार्याध्यक्ष जयंत देशमुख, वैराग शहराध्यक्ष प्रशांत भालशंकर, महिला जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णाताई शिवपुरे, महिला तालुकाध्यक्ष सुप्रियाताई गुंड, ग्रंथालय प्रदेश सरचिटणीस शिवशंकर ढवण, मंगेश चव्हाण, अल्पसंख्यांक वैराग शहराध्यक्ष बाबा शेख युवक शहराध्यक्ष आसिफ शेख, युवक सरचिटणीस राजशेखर गुंड पाटील, उमेश नेवाळे, विद्यार्थी शहराध्यक्ष सुरज वालवडकर, विद्यार्थी तालुका अध्यक्ष रत्नदीप कुलकर्णी, अनिकेत पाटील, शहनवाज शेख, अच्युत पवार, शिरीष ताटे हजर होते