राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलच्या मंगळवेढा तालुका कार्याध्यक्षपदी राजेंद्र आमुंगे यांची निवड - Pantnagari Times

Breaking News

Monday, July 19, 2021

राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलच्या मंगळवेढा तालुका कार्याध्यक्षपदी राजेंद्र आमुंगे यांची निवड


 

मंगळवेढा /प्रतिनिधी


राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सोशल मीडिया सेलच्या मंगळवेढा तालुका कार्याध्यक्षपदी मानेवाडी ता. मंगळवेढा येथील राजेंद्र आमुंगे यांची निवड करण्यात आली आहे. सदरचे नियुक्तीपत्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मिलिंद गोरे यांच्या वतीने देण्यात आले. निवडीनंतर राजेंद्र आमुंगे यांना युवक नेते व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ दादा भालके, महाराष्ट्र सहसचिव विजयकुमार खवतोडे, माजी युवक जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ, तालुकाध्यक्ष भारत बेदरे, शहराध्यक्ष मुजम्मिल काझी, प्रवक्ता तालुकाध्यक्ष शिवाजी काळे, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष अशोक माने, विद्यार्थी तालुका अध्यक्ष अमर सोंगगौंडे, आदींनी  अभिनंदन केले. 
सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्व ध्येयधोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून जनजागृती करणार असल्याचे नूतन तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र आमुंगे यांनी निवडीनंतर सांगितले आहे.

Pages