जनावरांच्या डॉक्टरांच्या संपाचा बळीराजाला फटका उपचाराअभावी बार्शी तालुक्यामधील 'या' भागातील बैलाचा मृत्यू - Pantnagari Times

Breaking News

Sunday, July 18, 2021

जनावरांच्या डॉक्टरांच्या संपाचा बळीराजाला फटका उपचाराअभावी बार्शी तालुक्यामधील 'या' भागातील बैलाचा मृत्यू


 

वैराग - मुजम्मिल कौठाळकर


पशुवैद्यकीय क्षेत्रातील पदवीधारकांकडून याच क्षेत्रातील पदवीधारकावर होत असलेला अन्याय दूर करण्याच्या मागणीसाठी शासकीय पशुधन पर्यवेक्षक,सहाय्यक पशुधन विकास अधिकारी तसेच खाजगी पशुवैद्यक 15 जुलै पासून बेमुदत संपावर गेले आहेत.त्यामुळे ग्रामीण भागातील पशुपालक चिंताग्रस्त झाले आहेत व तातडीने उपचार मिळणे बंद झाले आहे.या संपाचा मोठा फटका बार्शी तालुक्यातील पिंपरी (सा) येथील सर्वसामान्य कुटूंबातील शेतकरी तानाजी उद्धव काशीद यांना बसला आहे.त्यांच्या खिलार बैलाचा वेळेवर उपचार नमिळाल्याने जाग्यावरच तडफडून मृत्यू झाला.त्यांचे अंदाजे पन्नास ते साठ हजार रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.तानाजी काशीद व त्यांच्या पत्नी बालिका काशीद यांनी तालुक्यातील अनेक डॉक्टरांना संपर्क केला.मात्र संपामुळे कोणीच उपलब्ध होऊ शकले नाही.पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळलेल्या बैलाचा डोळ्यासमोरच तडफडून मृत्यू होत असल्याचे पाहून शेतकरी तानाजी काशीद व त्यांच्या पत्नी बालिका यांनी हंबरडा फोडला.ऐन मशागतीच्या वेळेस बैलाचा मृत्यु झाल्याने तानाजी काशीद यांचा जगण्याचा आधार तुटला आहे.जोपर्यंत पंचनामा होत नाही तोपर्यंत बैलाचा विधी करणार नाही अशी भूमिका शेतकरी तानाजी काशीद यांनी घेतली आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामा करावा व आर्थिक मदत मिळवून द्यावी.

Pages