मुजम्मिल नसरुद्दीन सय्यद- कौठाळकर यांची साप्ताहिक पंतनगरी टाईम्स च्या उपसंपादकपदी निवड - Pantnagari Times

Breaking News

Friday, July 16, 2021

मुजम्मिल नसरुद्दीन सय्यद- कौठाळकर यांची साप्ताहिक पंतनगरी टाईम्स च्या उपसंपादकपदी निवड


 

मंगळवेढा / प्रतिनिधी

 पत्रकार मुजम्मिल नसरोद्दीन सय्यद कौठाळकर यांची साप्ताहिक पंतनगरी टाईम्स या वृत्तपत्राच्या उपसंपादक पदी निवड करण्यात आली वैराग ता. बार्शी येथील पत्रकार मुजम्मिल कौठाळकर हे यूट्यूब चैनल विजय न्यूजचे संपादक म्हणून काम पहात आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील अन्याय अत्याचार व भ्रष्टाचार  विरोधी काम करून शासन व प्रशासन दरबारी प्रकटपणे मत मांडून अन्यायाला वाचा फोडली आहे. याचीच दखल घेत साप्ताहिक पंतनगरी टाईम्सचे संस्थापक-संपादक मदार सय्यद यांनी निवडीचे पत्र हुन्नूर तालुका मंगळवेढा येथे देण्यात आले. 

यावेळी समीर कौठाळकर, समीर दरवाजकर आदी उपस्थित होते. साप्ताहिक पंतनगरी टाईम्सच्या उपसंपादकपदी निवड झाल्याबद्दल मुजम्मिल कवठाळकर यांचा सत्कार जाहिरात व्यवस्थापक हसन नदाफ, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देताना मुजम्मिल कौठाळकर यांनी सांगितले की माझे वडील व वैराग चे ज्येष्ठ पत्रकार कै. नसरोद्दीन कौठाळकर यांनी वैराग परिसरातील गोरगरीब जनतेचे प्रश्न शासन दरबारी पाठपुरवठा करून न्याय मिळवून देत होते त्यांचाच वारसा पुढे चालवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन असे मुजम्मिल कौठाळकर यांनी सांगितले

Pages