मंगळवेढा / प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या लसीकरणावरही केंद्र आणि सरकार भर देत आहेत. अशावेळी मंगळवेढा तालुक्यातील सर्व पत्रकार व त्यांच्या परिवारासह तातडीने लसीकरण करण्याची मागणी मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष समाधान फुगारे यांनी केली आहे.
संपूर्ण राज्यात लसीकरणाची मोहीम पुन्हा एकदा जोमाने सुरू झाली आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना सर्व नागरिकांना मध्ये लॉकडाउन काळात जनजागृती करने व कोविड -19 चा प्रसार कमी व्हावा या करिता मंगळवेढा तालुक्यातील पत्रकार बांधवांनी अथक प्रयत्न केलेले आहेत.
पत्रकार हे सातत्याने बातमीदारी करण्याच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनाही धोका आहे.
मंगळवेढा तालुक्यातील आम्हा सर्व पत्रकार मंडळींना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देऊन आमचे तातडीने लसीकरण करण्यात यावे असे माझे मत आहे. आम्हा सर्व पत्रकार बांधवांना आमच्या परिवारासह लसीकरण करण्यात यावे अशी विनंती समाधान फुगारे यांनी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले व तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्याकडे केली आहे.