अश्पाक आत्तार यांची महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेच्या युवक सोलापुर जिल्हाअध्यक्षपदी निवड - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, May 12, 2021

अश्पाक आत्तार यांची महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेच्या युवक सोलापुर जिल्हाअध्यक्षपदी निवड


 


मंगळवेढा / प्रतिनिधी

    तावशी येथील समाज सेवक अशपाक आत्तार यांच्या कार्याची दखल घेऊन मा नाहिद भाई मुजावर युवक प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट

 यांनी मा नदीम भाई मुजावर संस्थापक अध्यक्ष मुस्लिम फ्रंट यांच्या आदेशानुसार निवड करण्यात आली.व तसेच सोलापूर उप जिल्हाध्यक्ष मुस्तफा तांबोळी पत्रकार, सोलापूर शहर अध्यक्ष इम्रान भाई  सय्यद पत्रकार, पंढरपूर शहर अध्यक्ष पै मैनुद्दिन मनेरी, पंढरपूर तालुका अध्यक्ष

सद्दाम भाई  मुलानी, पंढरपूर तालुका उपाध्यक्षआयाज भाई मुलानी, मंगळवेढा  तालुका अध्यक्ष सादिक भाई मुजावर, मंगलवेढ़ा तालुका उप अध्यक्ष

तोसिफ  बागवान, या सर्वांच्या नियुक्तया करण्यात आली. 

 तसेच नदीम भाई यांनी अश्पाक भाई यांना शुभेच्छा देऊन संघटना चांगल्या कार्यात सदैव सोबत राहील असे आश्वासन दिले. 

    चालु परिस्थिति पाहुन सर्व समाजासाठी कोविड रूग्न सेवे साठी स्वत वापरातील तीन फोर व्हीलर वाहन दिले आहे व तसेच पवित्र असे रमजान च्या ईद साठी सर्व मित्र परीवार व संघटनेच्या 

माध्यमातून गोर गरीबांना कीराणा वाटप करण्यात येणार आहे असे नव निर्वाचित सोलापुर युवक जिल्हा अध्यक्ष अश्पाक भाई आत्तार यांनी सांगितले आहे. व तसेच संघटनेने जो विश्वास ठेऊन समाजाची सेवा करण्याची संधी दिल्या बद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आहे. 

     समाजाच्या सेवे साठी सदैव तत्पर असणारे अश्पाक भाई आत्तार यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.

Pages