जयसिंगपूर चे प्रसिद्ध एम.डी डॉ.मुसद्दिक सय्यद यांचे कोरोना आजाराने निधन - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, May 4, 2021

जयसिंगपूर चे प्रसिद्ध एम.डी डॉ.मुसद्दिक सय्यद यांचे कोरोना आजाराने निधन


 

जयसिंगपूर / प्रतिनिधी


जयसिंगपूर तालुका शिरोळ येथील डॉक्टर मुसद्दिक आयुब सय्यद यांचे कोरोना आजाराने आज सांगली  येथील खाजगी दवाखान्यात त्यांनी अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला मृत्युसमयी ते तीस वर्षाचे होते त्यांच्या पश्चात आई बहीण एक भाऊ असा परिवार आहे

डॉक्टर एम ए सय्यद यांच्या ए आर क्लीनिक नांदणी तर्फे विविध प्रकारच्या त्वचारोगावर अनेक ठिकाणी मुक्त तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करून त्वचा विकारावर उपचार व मार्गदर्शन करून हाजारो त्वचारोगावर उपचार केले होते

डॉक्टर मुसद्दीक सय्यद यांचे नांदणी येथे क्लिनिक होते सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अचूक निदान व उपचार करत असल्याने कोल्हापूर सांगली आदी भागांमधून पेशंट उपचार करण्यासाठी येत होते त्यांच्या निधनाने कोल्हापूर सांगली सोलापूर जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे 30 एप्रिल रोजी त्यांचे वडील आयुब सय्यद यांचे ही कोरोने निधन झाले होते एकाच कुटुंबातील वडील आणि मुलाचे निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा कोसळला आहे 

वैरागचे  कै. पत्रकार नसरुद्दीन कवठाळकर  व मैनुद्दीन कवठाळकर 

यांचे ते भाचे होत.

Pages