मानेवाडी येथील ' त्या ' गावडे कुटुंबाला धनश्री परिवाराने दिला आधार - Pantnagari Times

Breaking News

Sunday, March 28, 2021

मानेवाडी येथील ' त्या ' गावडे कुटुंबाला धनश्री परिवाराने दिला आधार


 

मंगळवेढा / प्रतिनिधी

मानेवाडी ता. मंगळवेढा येथील अंजना आण्णा गावडे या महिलेच्या घराला अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.  दि २६ रोजी झालेल्या या घटनेची माहिती समजताच धनश्री परिवाराचे  संस्थापक शिवाजीराव काळुंगे यांनी अंजना आण्णा गावडे यांच्या कुटुंबाला भेट देऊन आर्थिक मदतीचा आधार दिला. यावेळी हुन्नुर पतसंस्थेचे शाखाधिकारी ब्रम्हदेव कुंभार, नंदेश्वर शाखेचे शाखाधिकारी ज्ञानेश्वर फटे,भोसे शाखेचे शाखाधिकारी राजु सूर्यवंशी, ग्रामसेवक मुटेकर, सरपंच दत्ता मळगे, महादेव कोरे, गुलाब गावडे, बिराप्पा गावडे, आर्जुन गावडे, बाळु माने , वसंत आमुंगे, शामराव आमुंगे, दादा गावडे, शिवाजी गावडे, विनायक गावडे उपस्थित होते.* धनश्री परिवाराच्या मदतीची पंचक्रोशीत चर्चा *


मंगळवेढा तालुक्यात धनश्री परिवार नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहिला आहे. वेळोवेळी गुणवंतांचा सत्कार करणे, जिथे गरज आहे तिथे अग्रक्रमाने मदत करणे अशा प्रकारचे अनेक सामाजिक उपक्रम धनश्री परिवाराच्या वतीने नेहमीच राबवले जातात. धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. आता पुन्हा पोटनिवडणूक लागल्यामुळे अनेक नेते निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत पण शिवाजीराव काळुंगे हे होऊ घातलेल्या या पोटनिवडणुकीपासून सध्या चार हात अंतरावर आहेत. असे असतानाही मानेवाडी येथील एका गरीब महिलेच्या कुटुंबावर आलेल्या अस्मानी संकटात खारीचा वाटा उचलत धनश्री परिवाराने आर्थिक मदत केली आहे. धनश्री परिवाराच्या या मदतीची सध्या पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे.

Pages