गट - तट जरी एकत्र आले तरी पंढरपूर - मंगळवेढ्याची जनता माझ्या पाठीशी : भगीरथ भालके - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, March 30, 2021

गट - तट जरी एकत्र आले तरी पंढरपूर - मंगळवेढ्याची जनता माझ्या पाठीशी : भगीरथ भालके


 

पंढरपूर- प्रतिनिधी


ऊसउत्पादक शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय, परिसरातील सामाजिक कार्यामध्ये योगदान, तसेच भालके कुटुंबीयांवर असलेला विश्‍वास, यामुळे आपण मतदारांमध्ये विश्‍वास निर्माण करू शकलो.कोणतेही गट-तट एकत्र येवू द्यात काही फरक पडणार नाही कारण पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील जनता माझ्या सोबत आहे. याच विश्‍वासाच्या जोरावर पंढरपूर-मंगळवेढा तालुक्‍यासह संपूर्ण मतदारसंघ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे प्रतिपादन पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांनी केले.


उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील पानीवकर, लतीफभाई तांबोळी, अदी उपस्थित होते. भालके म्हणाले , राज्यात महाविकास आघाडी चांगले काम करत असून येथेही सर्व सहकारी पक्ष एकत्र आहोत. आमचे सर्व नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. येथे आमच्या सहकारी पक्षातील ज्यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यांची भेट घेवून मी चर्चा करणार आहे.

Pages