कोरोनाच्च्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र माचणूर येथे पोलिस बंदोबस्त ठेवून येणाऱ्या भाविकांना रोखले - Pantnagari Times

Breaking News

Saturday, March 13, 2021

कोरोनाच्च्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र माचणूर येथे पोलिस बंदोबस्त ठेवून येणाऱ्या भाविकांना रोखले


 

मंगळवेढा /  प्रतिनिधी

दरवर्षी प्रमाणे सोलापूर जिल्हायातील मंगळवेढा तालुक्यातील माचणुर येथील ग्रामदैवत श्री क्षेत्र सिद्धेशवर देवस्थानची यात्रा कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन प्रशासन विभाग  व यात्रा कमिटीनी बैठक घेऊन यात्रा होणार नाही अशी माहिती जाहीर केली होती.शासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले व पाच पुजारी यांच्यासह पूजा पार पडली.त्यानंतर भाविकांना कोरोनाचे नियम पाळून लांबुनच दर्शन घेतले.दहा वाजता मात्र मंदिर परिसरात भाविकांना दर्शनासाठी बंदी घालण्यात आली. भाविकाविना मंदिर परिसर शुकशुकाट दिसून येत होते. रात्री 7 च्या दरम्यान माचणुर गावातून  सिद्धेश्वरांची पालखी मंदिरात आणण्यात आली. प्रशासनाच्या नियम पाळून 10 लोकांनाच परवानगी दिली आहे. त्यानुसार ही पालखी सिद्धेश्वर मंदिरात आणण्यात आली. यात्रेसाठी भाविकांची गर्दी होवू नये यासाठी पोलीस पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी रात्रीपासूनच बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यानंतर गुरुवारी सकाळी सहायक पोलीस निरीक्षक भगवान बुरसे, सत्यजित आवटे,पोलीस उपनिरीक्षक प्रणोती  यादव,40 पोलीस कर्मचारी,3 कमोंडो  व ग्राम सुरक्षा दल  यांच्यासह मोठा फौजफाटा लावण्यात आला आहे.11मार्च 15 दरम्यान  यात्रेसाठी भाविकांनी येऊ नये असे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे.

Pages