देशभरात टोल भरण्यासाठी इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टम FASTag आवश्यक असेल. राष्ट्रीय महामार्गावरील कोणताही टोलनाका ओलांडण्यासाठी तुम्हाला फास्टॅग आवश्यक आहे. कॅश ट्रान्झेक्शनच्या तुलनेत फास्टॅगमुळे टोल प्लाझामध्ये लागणारा वेळ वाचणार आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्व गाड्यांना फास्टॅग अनिवार्य केला आहे. याची अंलबजावणी उद्या १५ फेब्रुरीपासून करण्यात येणार आहे. म्हणजे आज रात्री १२ वाजल्यापासून फास्टॅग अनिवार्य असणार आहे. फास्ट टॅग नसेल तर उद्यापासून तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे. याआधी १जानेवारीपासून फास्टॅग लागू करण्यात येणार होता मात्र सरकारने याची मुदत वाढवून १५ फेब्रुवारी केली होती.
देशभरात टोल भरण्यासाठी इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टम FASTag आवश्यक असेल. राष्ट्रीय महामार्गावरील कोणताही टोलनाका ओलांडण्यासाठी तुम्हाला फास्टॅग आवश्यक आहे. कॅश ट्रान्झेक्शनच्या तुलनेत फास्टॅगमुळे टोल प्लाझामध्ये लागणारा वेळ वाचणार आहे.
फास्ट टॅग म्हणजे काय?
फास्टॅग एक स्टिकर आहे जे तुमच्या गाडीच्या विंडस्क्रिनवर लावले जाते. हे स्टिकर कारच्या विंडशिल्डच्या आत लावले जाते. यात बारकोड असतो. डिव्हाईस रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन टेक्नोलॉजीचा वापर यात केला जातो जी टोल प्लाझावरील स्कॅनरला कनेक्ट असते. गाडी पास झाल्यानंतर तुमच्या फास्ट टॅग अकाऊंटमधील पैसे कट होतात. फास्ट टॅगला तुमच्या वॉलेट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डला जोडू शकता. ज्या ज्या ठिकाणी टोल लागेल तेव्हा तुमच्या अकाऊंटमधून पैसे वजा होतील.
.तर दुप्पट टॅक्स भरावा लागणार
जर तुमच्या गाडीवर फास्टॅग लावला नसेल तुम्हाला मार्शल लेनमध्ये प्रवेश मिळणार नाही. मात्र जर तुम्ही फास्टॅगच्या लेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमच्या गाडीचा जेवढा टॅक्स असेल त्याच्या दुप्पट टॅक्स भरावा लागेल.
कसे खरेदी कराल फास्टॅग?
फास्ट टॅग देशभरातील कोणत्याही टोल बुथवर खरेदी करता येतो. फास्टॅग खरेदी करण्यासाठी तुमच्या गाडीच्या रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्ससह आयडीची आवश्यकता आहे. याव्यतिरिक्त स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, पेटीएम पेमेंट्स बँक आणि आयडीएफसी फर्स्ट आदी बँकांसह २२ बँकांमधून खरेदी करु शकता. याशिवाय पेटीएम, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्डसारख्या ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवरही तुम्ही फास्टॅग खरेदी करु शकता.
अनेक बँकांनी आपल्या मोबाईल ॲपवर फास्टॅग खरेदीवर डिस्काऊंट, एक्सक्लुसिव्ह ऑफर्स आणि कॅशबॅक ऑफर दिल्या आहेत.
किती असेल फास्टॅगची किंमत?
फास्टॅगची किंमत दोन बाबींवर अवलंबून आहे. तुमच्याकडे वाहन कोणते आहे आणि तुम्ही कुठून फास्टॅग खरेदी करता यावर त्याची किंमत अवलंबून आहे. इश्यु फी आणि सिक्युरिटी डिपॉझिटची किंमत प्रत्येक बँकेची वेगळी असू शकते. फास्टॅग तुम्ही घरबसल्या खरेदी करु शकता.
जर फास्टॅग एनएचएआय प्रीपेड वॉलेटशी जोडलेला असेल तर याला रिचार्ज करता येतो. हा युपीआय/डेबिट या क्रेडिट कार्ड/NEFT/नेट बँकिंग आदी माध्यमातून रिचार्ज करु शकता. जर बँक खाते फास्टॅगशी जोडले असेल तर पैसे खात्यातून कट होतील. तुम्ही पेटीएम वॉलेटला फास्टॅगशी जोडल्यास वॉलेटमधून तुम्ही रिचार्ज करु शकता.
वैधता किती?
फास्टॅग खात्यात मिनिमम बॅलन्सची अनिवार्यता आता काढून टाकण्यात आली आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार रिचार्ज करु शकता. फास्टॅगची वैधता जारी झाल्यापासून पाच वर्षे आहे. रिचार्ज केल्याने ही वैधता वाढत नाही.