प्रतिनिधी / पंढरपूर
पुणे पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार आरुण लाड यांनी पंढरपूर येथे आभार दौरा केला आहे. यामध्ये येथील विठ्ठल हॉस्पिटल येथे महाविकास आघाडीच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
या आभार दौऱ्याच्या वेळी
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, विठल सह साखर कारखान्याचे चेअरमन भगिरथदादा भालके, राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते युवराजदादा राष्ट्रवादी अल्पसंख्याक अध्यक्ष लतीफ भाई तांबोळी पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
दिपकदादा पवार, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष गणेशदादा पाटील, पंढरपूर शहर अध्यक्ष सुधीर भोसले,चंद्रकांतदादा देशमुख,राजेश भादुले,नरसाप्पा देशमुख,बाळासो पाटील,बाळासो यलमार,हेमंत पाटील,
रमेश पाटील,अरुण आसबे,श्रेया भोसले,साधना राऊत,अनिता पवार,सागर पडगळ
व महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे पदधिकारी कार्यकर्तेयावेळी उपस्थीत होते.
यावेळी प्रास्तविक तालुकाध्यक्ष दिपक पवार यांनी केले.यामध्ये पदविधरांसाठी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी मोठ्या गावातुन अभ्यासिका निर्माण करण्यासाठी निधी द्यावा अशी मागणी केली.
यावर आपल्या मनोगतात आ. लाड यांनी वरील मागणीचा नक्कीच विचार तर करूच परंतु पदविधरांसाठी जे जे शक्य आहे ते करण्यासाठी मी वचनबद्ध आहे अशी ग्वाही
आ ,लाड यांनी दिली.