निर्भीड पत्रकार चाँदभैय्या शेख यांना आदर्श पत्रकार रत्न पुरस्कार जाहीर - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, February 9, 2021

निर्भीड पत्रकार चाँदभैय्या शेख यांना आदर्श पत्रकार रत्न पुरस्कार जाहीर


 

 सांगोला / प्रतिनिधी

        विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था कोचळेवाडी / सातारा तर्फे सीबीएस न्युज मराठी चे मुख्य संपादक  तथा सोलापूर  जिल्हाचे निर्भीड पत्रकार चाँदभैय्या शेख यांना आदर्श पत्रकार रत्न हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


साहित्य, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारी विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था कोचळेवाडी ही संस्था यंदा राज्यस्तरीय पुरस्कार आयोजित करीत आहे . यानिमित्त संस्थेच्यावतीने साहित्य, पत्रकारिता, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक ,वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये पत्रकारिता क्षेत्रात महाराष्ट्रातून सोलापूर जिल्ह्यातील निर्भीड पत्रकार व सीबीएस न्यूज चे मुख्य संपादक चाँदभैय्या शेख यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. संस्थेच्यावतीने नितीन वरखडे ,विजय पवार ,जयेश शिंदे ,संतोष हराळे , ह.भ.प.भागवताचार्य महेशजी महाराज मारूती साळुंखे ,कु.मुद्रा करंडे या मान्यवरांनाही विविध पुरस्कार जाहीर झाले असून या पुरस्कारांचा वितरण सोहळा  १८ फेब्रुवारी रोजी वाई येथे होणार असल्याची माहिती संस्थेचे

शशिकांत एकनाथ कोचळे यांनी केले आहे .विशेषतःसांगोला तालुक्यातील पारे गावचे सुपुत्र चाँदभैय्या शेख आहेत.जनसामान्यांना भेडसावणारे प्रश्न सातत्याने CBS News मराठी च्या माध्यमातून मांडतात. वंचितांचे, सोशितांचे , पीडितांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांना जाब विचारण्याचे काम चाँदभैय्या  आजही धडाडीनं करत आहेत. ज्यांचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहचू शकत नाही अशा अनेकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम  गेली अनेक वर्ष निर्भीडपणे करत असल्यानं त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे .विशेष म्हणजे यंदा हा पुरस्कार मिळवणारे ते एकमेव महाराष्ट्रातील  आहेत. पुरस्कार जाहीर होताच सोलापूर जिल्ह्यात जल्लोष करण्यात आला .

Pages