दिव्यांगांना अपंग वित्त महामंडळाकडून सर्वतोपरी मदत करू- राज्य संपर्क प्रमुख रामदास खोत - Pantnagari Times

Breaking News

Sunday, February 7, 2021

दिव्यांगांना अपंग वित्त महामंडळाकडून सर्वतोपरी मदत करू- राज्य संपर्क प्रमुख रामदास खोत


 

मंगळवेढा / प्रतिनिधी


 मंगळवेढा शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिव्यांगांनी महामंडळाकडे जास्तीत जास्त प्रकरणे द्यावीत ते आपण ना बच्चू कड्डू यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून मंजूर करू व दिव्यांगांना न्याय मिळवून देऊ असे प्रतिपादन प्रहार संघटनेचे राज्य संपर्कप्रमुख रामदास खोत यांनी केले. मंगळवेढा नगरपालिकेचा पाच टक्के अपंग निधी व जिल्हा कार्यकारणी आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुका प्रमुख, शहर प्रमुख, पदाधिकारी, सोलापूर जिल्हा अध्यक्ष, सोलापूर शहर प्रमुख उपस्थित होते. पुढे बोलताना रामदास खोत म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा तालुक्यात अपंग बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात असून या तालुक्यातील ग्रामीण भागातील व शहरातील अपंगांना उद्योग व व्यवसाय करता यावा यासाठी दिव्यांग बांधवांनी महामंडळाकडे प्रकरणे द्यावीत ती प्रकरणे आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून अपंगांना न्याय मिळवून देऊ असे ते म्हणाले. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत पंचडराव यांच्या हस्ते दिव्यांगाना अपंग ओळखपत्र नगरपालिकेतर्फे देण्यात आली व नगरपालिकेचा पाच टक्के निधी वाटप करण्यात आला . मुख्याधिकारी निशिकांत पंचडराव  म्हणाले की दिव्यांग बांधवांसाठी त्यांच्या आरोग्यासाठी नगरपालिकेतर्फे हेल्थ इन्शुरन्स काढून त्यांना कार्ड दिली जाणार असून त्यामुळे अपंगांना भविष्यात एक जीवन सुरक्षा निर्माण होणार आहे. तसेच जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मस्के पाटील म्हणाले मंगळवेढा तालुक्यामध्ये अपंग प्रहार संघटनेचे काम चांगले असून दिव्यांग बांधवांना जिल्हाध्यक्ष या नात्याने न्याय मिळवून देऊ. दिव्यांग बांधवांच्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवू. यावेळी राज्य संपर्कप्रमुख रामदास खोत यांच्या रामदास खोत यांच्या हस्ते नगरपालिकेमध्ये दिव्यांग बांधवांसाठी योगदान देणारे नगरपालिकेचे कर्मचारी युनुस मोगल यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भारतीय हॅडबॉल राष्ट्रीय संघामध्ये निवड झाल्याबद्दल पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ लोहार यांचा ही सत्कार करण्यात आला. राजस्थान येथे दिव्यांग क्रिकेट स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मनोज धोत्रे यांचा सत्कार मुख्याधिकारी निशिकांत पंचडराव यांच्या हस्ते करण्यात आला.

महाराष्ट्र  संपर्क प्रमुख रामदास खोत व प्रहार जिल्हा अध्यक्ष दत्ता मस्के पाटील, युवा जिल्हा अध्यक्ष संतोष पवार ,प्रहार जिल्हा  सरचिटणीस श्रीपाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सिदराया माळी,  प्रहार शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष  सचिन गरंडे, संजय  जगताप, संदिप तळेकर, पिंटू शेगर,दत्ता  चौगुले, अंबुताई गुजले,समाधान हेंबाडे, बापु घोडके,नवनाथ मासाळ, प्रथमेश गाडवे, रोहिदास कांबळे, शकिल खाटीक, नागेश मुदगूल, रविराज जगताप, अनिल धोडमिसे, गुरुनाथ शिवशरण, सुधिर हजारे,  आनंद गुंगे, महिला तालुका अध्यक्ष आश्विनी पाटील, शहराध्यक्ष सविता सुरवसे,सर्जेराव  पाराध्ये, अक्षय पवार, तानाजी  जाधव,गणेश लामकाने,विजय पुरी, पिंटू  भोसले , राहुल खांडेकर  तसेच मंगळवेढा तालुक्यातील व जिल्ह्यातील  पदाधिकारी व दिंव्यांग बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी सुत्रसंचालन तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे ,प्रास्ताविक सिद्राया माळी व आभार श्रीपाद पाटिल यांनी मानले.

Pages