आनंदाची बातमी ! भोसे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना आठ दिवसात सुरू होणार- भगीरथ भालके - Pantnagari Times

Breaking News

Monday, February 15, 2021

आनंदाची बातमी ! भोसे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना आठ दिवसात सुरू होणार- भगीरथ भालके


 

मंगळवेढा  / प्रतिनिधी 

         तालुक्यातील दक्षिण भागातील 39 गावासाठी  वरदान ठरलेली भोसेसे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना गेल्या सहा महिन्यापासून तांत्रिक बिघाड व विज बिलाआभावी बंद होती त्यामुळे या भागातील नागरिकांचे हाल लक्षात घेता विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे पाठपुरावा करून  जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून या योजनेसाठी 18 लाखांचा निधी मिळवून निविदा काढल्याने या योजनेचे दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू केले असून येत्या आठ दिवसात ही योजना सुरू होणार असल्याची माहिती भगीरथ भालके यांनी दिली     मंगळवेढ्याच्या दक्षिण भागातील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी दर वर्षी होणारे हाल पाहता तत्कालीन आमदार भारत भालके यांनी आघाडी सरकारकडे पाठपुरावा करून तसेच लोकवर्गणीची अट असताना येथील करून प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतले या योजनेला त्यावेळी सुमारे 70 कोटी रुपयांचा खर्च आला होता या योजनेमुळे दक्षिण भागातील सुमारे चाळीस गावातील महिलांच्या डोक्यावरील पाण्याचे हंडे कमी होऊन नागरिकांना घरोघरी पाणी मिळू लागले होते या योजनेचा चालविण्याचा खर्च पाणीपट्टी व वीज बिल हे ग्रामपंचायतीने पाहणे आवश्यक असताना आमदार भारत भालके यांनी सरकारकडून एक वर्ष योजना चालविण्याची मुदत असताना त्यांनी ती दोन वर्षे अगदी ग्रामपंचायत वर कोणताही भार न देता चालून घेतली होती त्यामुळे नागरिकांना चांगल्या पद्धतीने पाणी मिळत होते यासाठी सर्व ग्रामपंचायती मिळून शिखर समिती स्थापन करून या योजनेच्या देखभालीसाठी निधीची तरतूद करणे आवश्यक होते परंतु हे झाले नसल्यामुळे या योजनेच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले होते त्यामुळे ही योजना बंद झाली होती ही योजना सरकारी मदत करून सुरू करण्यासाठी आमदार भारत भालके यांनी सरकारकडे पाठपुरावा देखील केला होता परंतु दरम्यानच्या काळात आमदार भारत भालके यांचे निधन झाले त्यानंतर त्यांचे पुत्र व विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांनी योजना सुरू करून या भागातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळण्यासाठी निधीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री दत्तामामा भरणे तसेच ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे पाठपुरावा केला तसेच जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकारी यांच्याकडे देखील सातत्याने पाठपुरावा करून ही योजना सुरू करण्याची मागणी केली होती त्यानुसार  जिल्हा परिषदेने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे या योजनेसाठी 18 लाख रुपयांचा निधी  वर्ग केला त्याची निविदा काढली आहे तसेच निविदा देखील मंजूर झाली असून हा निधी तांत्रिक देखभाल, विज बिल व दुरुस्तीसाठी वापरला जाणार आहे ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे होती ती जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे परंतु सद्यस्थितीत उन्हाळ्याची सुरुवात झाले असून या भागातील नागरिकांना पाणी टंचाई जाणवू नये यासाठी योजना चालू करण्यासाठी निविदा काढली असून  दिनांक 16 पासून या योजनेच्या दुरुस्तीचे काम चालू होऊन या भागातील नागरिकांना आठ ते दहा दिवसात पाणी मिळणार असल्याने ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई चे आलेले संकट दूर होणार असल्यामुळे नागरिकांचे हाल वाचणार आहेत तसेच ही योजना चालू करण्यासाठी जिल्हा परिषद पदाधिकारी अधिकारी यांचे सहकार्य लाभले असून ही योजना कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीने आपली पाणीपट्टी, वीज बिले वेळेवर भरून सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे भालके यांनी सांगितले तसेच ही योजना चालण्यासाठी लाभार्थी गावांची एक समिती बनवून या समितीच्या माध्यमातून ही योजना चांगल्या पद्धतीने चालविण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले

Pages