विधानसभेच्या पोट निवडणुकीत समाधान आवताडे कमळ की घड्याळ हातात बांधणार मतदार संघाला लागली उत्सुकता ? - Pantnagari Times

Breaking News

Sunday, February 7, 2021

विधानसभेच्या पोट निवडणुकीत समाधान आवताडे कमळ की घड्याळ हातात बांधणार मतदार संघाला लागली उत्सुकता ?


 


नागेश मासाळ / मंगळवेढा प्रतिनिधी

     पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या कै.आ.भारत भालके यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या मतदारसंघाची पोटनिवडणूक मार्च-एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. परंतु या निवडणुकीकडे संपूर्ण मतदार संघाचे लक्ष लागून राहिले आहे. श्री संत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे हे भारतीय जनता पार्टी कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरतात की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घड्याळ हातात घेतात याची चर्चा सध्या मतदार संघातील मतदारांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे .राष्ट्रवादी पार्टी कडून आजमितीला भगीरथ भालके यांचे नाव जाहीर नसल्याने राष्ट्रवादीच्या गोटात शांतता आहे .कारण ऐनवेळीराष्ट्रवादी काँग्रेस कडून कोणाचे नाव समोर येईल याची खात्री नाही. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाच्या पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

आ. प्रशांत परिचारक यांनी देखील भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर कार्यकारणी मध्ये पंढरपूर मंगळवेढा मधील कार्यकर्त्यना इच्छुक नाव देऊन मतदार संघामध्ये कार्यकर्त्यांना बळ देण्याचे कार्य केल्याने .आपल्यालाच भारतीय जनता पार्टी कडून पोटनिवडणुकीमध्ये संधी मिळेल या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु आमदार प्रशांत परिचारक यांची विधान परिषदेचा कालावधी अजून बाकी असल्याने भाजप कडून कोणाला संधी मिळते हे पाहणे महत्त्वाचे आहेत .श्री संत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी २०१९ ची विधानसभेची निवडणूक ऐन वेळी भारतीय जनता पार्टी कडून तिकीट नाकारल्याने अपक्ष निवडून साठ हजारांच्या आसपास मते मिळाल्याने पोटनिवडणुकीत त्यांना भारतीय जनता पार्टी कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्‍यता आहे. त्यांचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस कडून भगीरथ भालके यांना उमेदवारी न देता समाधान आवताडे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे कारण यापूर्वी मंगळवेढा मतदार हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता त्यावेळी ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे, समाधान आवताडे हे राष्ट्रवादी मध्ये होते .सध्या मंगळवेढा पंचायत समिती, जिल्हा परिषद गट, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ, दामाजी कारखान्यावर अवताडे गटांचे एक हाती सत्ता असल्याने व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजय मामा शिंदे यांच्याबरोबर असलेली मैत्री व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेबांची समाधान दादा आवताडे यांच्याशी असलेले घनिष्ट संबंध लक्षात घेता यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान दादा अवताडे आगामी निवडणुकीत भाजपचे कमळ हाती घेतात की राष्ट्रवादीचे घड्याळ हातात घेतात याची उत्सुकता सध्यातरी मतदारसंघात कार्यकर्त्यांना लागून राहिलेली आहे.

Pages