स्व. आ. भारत भालके यांच्या जयंती निमित्ताने जनसंवाद यात्रेचे आयोजन... भगीरथ भालके करतील सारथ्य.. - Pantnagari Times

Breaking News

Thursday, February 11, 2021

स्व. आ. भारत भालके यांच्या जयंती निमित्ताने जनसंवाद यात्रेचे आयोजन... भगीरथ भालके करतील सारथ्य..


 

मंगळवेढा  / प्रतिनिधी


पंढरपूर मतदार संघाचे आ. भारत भालके यांच्या निधनामुळे मतदारसंघ काही महिन्यांपासून पोरका झाला आहे फेब्रुवारीमध्ये 13 तारखेला त्यांचा जन्मदिवस असतो. याच दिनाचे औचित्य साधत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांनी मतदार संघातील लोकांशी संवाद साधण्यासाठी स्व. आ भारत भालके यांच्या जयंती दिनापासून ही संवाद यात्रा करण्याचे निश्चित केले असून याचे उदघाटन राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती भगीरथ भालके यांनी दिली


गेल्यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे मतदारसंघातील अनेक विकास कामे खोळंबून आहेत अशा परिस्थितीत देखील आपल्या शरीराची व तब्येतीची काळजी न करता मुंबई येथे अविरतपणे मतदारसंघातील व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची कामे मार्गी लावण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती लोकनेते भालके यांनी दिली पक्षातील व राजकीय मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी कोरोनाच्या काळात विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असतानादेखील मतदारसंघातील जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी त्यांची कामे मार्गी लावावी लागतील या भावनेने त्यांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले अडीच माहिन्या पूर्वी त्यांनी आपला निरोप घेतला मात्र अत्यवस्थ अवस्थेत असताना देखील त्यांनी पस्तीस गावच्या उपसा सिंचन योजनेचा ध्यास सोडला नाही. त्यांचे स्वीय सहाय्यक रावसाहेब फटे यांना मेसेज केले भगीरथ ला सोबत घेऊन त्या भागातील काही कार्यकर्त्यांनासह   जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांना भेटण्यास असे सांगितले यामुळे मतदार संघाने एक चांगला नेता गमावला लोकनेते भालके यांच्या निधनामुळे महाराष्ट्रात सर्वत्र हळहळ व्यक्त झाली अनेकांनी प्रत्यक्ष भेटून मतदारसंघातील अपूर्ण कामे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू आणि कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे बोलून दाखवले मतदार संघातील अनेक गोरगरीब माय माता बंधू भगिनी कष्टकरी शेतकरी यांनी आम्हाला सांत्वन करून मोठा आधार दिला.

 या त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी थेट त्यांच्यापर्यंत जाऊन संवाद साधण्यासाठी यात्रेचे आयोजन केले असे भगीरथ भारत भालके यांनी सांगितले

शनिवारी सायंकाळी चार वाजता मंगळवेढ्यातील आठवडा बाजार चौकातून या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहोळ चे माजी आमदार राजनजी पाटील हे असणार आहेत तर  आ प्रणितीताई शिंदे आ संजय मामा शिंदे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक आबा साळुंखे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे चांदापुरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उत्तमराव जानकर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ मस्के आरपीआय कवडे गटाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले आदी मान्यवर या जनसंवाद यात्रेसाठी उपस्थित राहणार असून ही जनसंवाद यात्रा यशस्वी करण्यासाठी महाविकासआघाडी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील अनेक पदाधिकारी व सहकारी प्रयत्न करत आहेत अशी माहिती भगिरथ भारत भालके यांनी दिली

Pages