सोलापूर - जगात देशात राज्यात तसेच सोलापूर जिल्ह्यात कोरोना या महामारी ने धुमाकूळ घातला असून याबत केंद्र सरकार राज्यसरकार या रोगाला अटकाव करण्यासाठी महसूल प्रशासन पोलीस प्रशासन महापालिका प्रशासन आरोग्य यंत्रणा वेगवेगळ्या उपाययोजना करत असताना पत्रकारांनी आपले कुटुंब बाजूला सारून व आपला जीव धोक्यात घालून प्रशासनाच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम केले आहे त्यात युट्युब चॅनल च्या संपादक व पत्रकारांचा मोठा सिंहाचा वाटा असून आता कोरोना या महामारी चे लस राज्य सरकार कडे उपलब्ध झाली असून सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांना तात्काळ कोरोना ची लस देण्यात यावी अशी मागणी पत्रकार सुरक्षा समिती वतीने जिल्हाधिकारी सोलापूर यांना देण्यात आले आहे
*किती पत्रकारांचा बळी गेल्यावर लस देणार? यशवंत पवार यांचा जळजळीत सवाल*
कोरोना महामारी ने राज्यात जवळपास चाळीस पत्रकारांचा मृत्यू झाला असून चारशे पत्रकारांना कोरोना रोगाची लागण झालेली आहे अश्या बिकट व कठीण परिस्थितीत आणखी किती पत्रकारांचा मृत्यू झाल्यावर कोरोना ची लस देणार असा संतप्त सवाल प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी प्रशासन ला विचारला असून पत्रकारांना तात्काळ कोरोना लस उपलब्ध करून दयावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी यशवंत पवार यांनी दिला आहे
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष शब्बीर मणियार शहर अध्यक्ष डॉ रवींद्र सोरटे कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी उपाध्यक्ष बिपीन दिड्डी अक्षय बबलाद वैजिनाथ बिराजदार, नंदू कांबळे हरी भिसे दत्ता फाळके संगप्पा कांबळे इस्माईल शेख प्रसाद ठक्का इम्तियाज अक्कलकोटकर राजाभाऊ पवार नागेश बंडी रामलू भैरी श्रीनिवास बनसोडे महंमद शेख सोमनाथ मुंजे सतीश गडकरी इत्यादी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते