मंगळवेढ्याचे तलाठी उमेश सुर्यवंशी कोरोना योद्धा ; पालकमंत्री दत्तात्रय भरणेंच्या हस्ते सन्मानित ..! - Pantnagari Times

Breaking News

Saturday, February 13, 2021

मंगळवेढ्याचे तलाठी उमेश सुर्यवंशी कोरोना योद्धा ; पालकमंत्री दत्तात्रय भरणेंच्या हस्ते सन्मानित ..!


 

मंगळवेढा / प्रतिनिधी


मंगळवेढा शहर सजेचे तलाठी उमेश सुर्यवंशी यांनी कोविड 19 या विषाणूचा प्रतिबंधात्मक करणेकामी उत्कृष्ठरित्या योगदान दिल्याबद्दल जिल्हा महसूल प्रशासनातर्फे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देवून कोविड योध्दा म्हणून गौरविण्यात आले. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे,आ.बबनदादा शिंदे,जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आदी उपस्थित होते.


 मंगळवेढा शहर सजेमध्ये उमेश सुर्यवंशी मागील तीन वर्षापासून  कार्यरत आहेत.दि.23 मार्चपासून राज्यात कोविडच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन पुकारण्यात आले होते.या कालावधीत मंगळवेढा शहर व लगतच्या दोन ग्रामपंचायतीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांना कोविड सेंटरमध्ये भरती करून त्यांच्यावर उपचार करवून घेणे,जेवणखाण,लाईट व्यवस्था करणे,कोविड टेस्ट घेणे,पॉझिटिव्ह आढळलेला परिसर बॅरेगेट लावून भाग सील करणे,पॉझिटिव्ह लोकांना विलगीकरण कक्षात स्वतंत्र राहण्याची व्यवस्था करणे, आदी कामे मोठ्या जोमाने सुर्यवंशी यांनी या कालावधीत पार पाडली आहेत. त्याचबरोबर लॉकडाऊनमध्ये मध्य प्रदेशातील दहा नागरिक पायी चालत जात असताना मंगळवेढ्यात अडकले होते. 


त्यांना विलगीकरण कक्षात ठेवून त्यांची जेवणाची व्यवस्था करून पंधरा दिवसानंतर स्वखर्चाने वाहन करून त्यांच्या गावी पाठविण्याचे कार्य यावेळी त्यांनी केले होते.ऊसतोडणी कामगार यांनाही त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले होते.दामाजी व चोखामेळा नगर परिसरातील नागरिकांकडून दीड लाखाची लोकवर्गणी गोळा करून स्वसंरक्षणासाठी गोरगरीबांना त्याचे वाटप केले होते.

नगरपालिका,पोलिस प्रशासन,आरोग्य विभाग,पंचायत समिती या सर्व विभागाशी समन्वय साधून कोविडचे कार्य पार पाडले होते.दरम्यान प्रहार संघटनेकडून यापुर्वीही त्यांना चांगल्या कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले तसेच प्रसार माध्यमांना वेळोवेळी लोकांची पॉझिटिव्ह माहिती देण्याचे कामही त्यांनी वेळेवर केले होते.

Pages