परांडा / प्रतिनिधी
आज रोजी परंडा येथिल समाजसेवक तय्यब मुजावर यांची महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट युवक सामाजिक संघटना च्या परंडा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. नेहमी समाज कार्यात अग्रेसर असणारे समाजासाठी नेहमी धडपड करणारे समाजाचे सेवक तय्यब मुजावर यांच्या कार्याची दखल घेऊन मा नदीम भाई मुजावर संस्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्ति पञ देण्यात आले.
यावेळी आसिफ जमादार मराठवाडा अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट , रईस मुजावर महाराष्ट्र राज्य उप अध्यक्ष, सरफराज शेख, मुन्ना मोमीन, रमजान मुजावर (मेजर), रफीक मोमीन, आखिल सय्यद, रफीक हन्नुरे, इरफान शेख आदी उपस्थित होते.