ज्यांच्याकडे टीव्ही फ्रीज आणि दुचाकी असेल, त्यांचे बीपीएल कार्ड रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा कर्नाटक राज्याचे अन्न , नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री उमेश कट्टी यांनी केली.
बेळगाव : कर्नाटक राज्यात ज्यांच्याकडे टीव्ही फ्रीज आणि दुचाकी असेल, त्यांचे बीपीएल कार्ड रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री उमेश कट्टी यांनी केली.
बेकायदेशीरबीपीएल रेशनकार्ड रद्द करण्यासाठी काही कालवधी लागतो. मात्र, बीपीएल कार्ड कोणाकडे असावे, ते देखील प्रमाणित आहे. व्यक्तींकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन, दुचाकी, टीव्ही आणि फ्रीज नसावेत.
जो कोणी या सर्व निकषांची पूर्तता करत नाही त्याला बीपीएल कार्ड परत करावे लागेल, असे त्यांनी सांगितले.
सरकारी, अशासकीय अधिकारी व्यतिरिक्त १ लाख २५ हजार रुपये उत्पन्न असलेल्या लोकांना बीपीएल कार्ड परत करावे लागेल. यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे, असे कट्टी यांनी सांगितले. गरीबी रेषेखाली जगणाऱ्या लोकांना बीपीएल रेशन कार्ड मिळते.
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना शासन आर्थिक मदत पुरवते. जेणेकरून ते सहजपणे आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करू शकतील. ज्याचे उत्पन्न दरमहा पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी आहे.ज्यांचे पक्के घर नाही आणि घरात मोठे वाहन नाही, अशी लोक यासाठी अर्ज करू शकतात.