केंद्र सरकारचे कृषी कायदे देशाला गुलामगीरी मध्ये ढकलतील - ॲड राहुल घुले - Pantnagari Times

Breaking News

Sunday, February 7, 2021

केंद्र सरकारचे कृषी कायदे देशाला गुलामगीरी मध्ये ढकलतील - ॲड राहुल घुलेमंगळवेढा - प्रतिनिधी

मंगळवेढा येथील बोराळे नाका येथे केंद्र सरकारच्या शेतकरी विरोध कायदे निषेधार्थ व दिल्ली येथे शेतकरी अंदोलन करण्यात येत असलेल्या शेतकरी बांधवांच्या समर्थनार्थ मंगळवेढा शहर व तालुका येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड, अन्य विविध संघटना यांचे नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आले.. यावेळी ॲड राहुल घुले बोलताना म्हणाले या तीन ही कृषी कायद्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक दोन्ही भरडले जाणार असून देशा तील ठराविक वर्गाने शेतकऱ्यांचे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न चालविला आहे. अंबानी व अदानी या दोन उद्योगपती च्या दावणीला संपूर्ण देश बांधण्याचे काम मोदी आणि भाजप करत आहेत.केंद्र सरकारचे कृषी कायदे देशाला गुलामगीरी मध्ये ढकलतील अशी भीती घुले यांनी व्यक्त केली.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे समाधान क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात शेतकरी बांधवांच्या व्यथा व्यक्त करत केंद्र सरकार हे शेतकरी व सामान्य माणसाचे विरोधी नवीन नवीन कायदे आमलात आणून उद्योगपती यांचे हित जोपासत आहे अशा सरकारचा संभाजी ब्रिगेड मंगळवेढा याचे वतीने निषेध व्यक्त केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भारत बेदरे यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टिका करत शेतकरी बांधवांना केंद्र सरकारने देशद्रोही म्हटलेचा निषेध मंगळवेढा शहर व तालुका  राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने नोंदविला. यावेळी नगराध्यक्षा सौ. अरूणा माळी, सिध्देश्वर हेंबाडे, मनोज माळी  यानी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सुत्रसंचालन मंगळवेढा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष संदीप बुरकुल यानी केले. केंद्र सरकारच्या शेती कायद्याचे विरोधी रास्ता रोको आंदोलन करीता मंगळवेढा शहरातून व तालुक्यातून  काँग्रेस पक्षाचे नंदकुमार पवार, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग चे विजय खवतोडे, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मारूती वाकडे,राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष मुजम्मील काझी, काँग्रेस शहराध्यक्ष राजाराम सुर्यवंशी,पक्ष नेते अजित जगताप,नगरसेवक प्रवीण खवतोडे, जिल्हा सरचिटणीस दिलीप जाधव,  स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, बिराजदार, आबा खांडेकर, शहराध्यक्ष हर्षद डोरले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य पी बी पाटील सर,सौ.संगीता कट्टे पाटील तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस, सौ.प्रफुलता स्वामी शहराध्य, मुरलीधर घुले, सोमनाथ माळी, प्रविण हजारे, दादा टाकणे,संदिप घुले, दयानंद सोनगे, संतोष सोनगे, पंडित गवळी, नाथा ऐवळे, अमोल बचुटे,  मंदा सावंजी, सारिका सलगर , रेखा साळुंखे , स्मिता अवघडे , सुनीता मेटकरी, महानंदा धुमाळे, विनायक दत्तू,अजित गायकवाड, स्वप्निल भगरे, युवक वर्ग मोठ्या संख्येने  उपस्तिथ होते

Pages