मंगळवेढा तालुक्यातील 962 फेरफार नोंदीचे निर्गतीकरण - तहसीलदार स्वप्निल रावडे - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, February 10, 2021

मंगळवेढा तालुक्यातील 962 फेरफार नोंदीचे निर्गतीकरण - तहसीलदार स्वप्निल रावडे


 

मंगळवेढा / प्रतिनिधी


फेरफार नोदींचा जलदगतीने निपटारा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचनेनुसार तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने विशेष अभियान राबविण्यात आले. यामध्ये तालुक्यातील  962 नोदींचे निर्गतीकरण करण्यात आले असल्याची माहिती मंगळवेढ्याचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिली.

  जिल्ह्यासह तालुक्यातील प्रलंबित प्रकरणांची जलदगतीने निर्गती व्हावी यासाठी  दिनांक 1 ते 10  फेब्रुवारी 2021 या कालावधीत विशेष अभियान राबविण्यात आले होते. मंगळवेढा तालुक्यातील 7 मंडळातील 962 नोंदणीकृत  प्रलंबित  नोदींचे प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. 

तालुक्यातील नागरिकांनी तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडे असलेल्या प्रलंबित प्रकरणांची जलदगतीने निर्गती होण्यासाठी तसेच फेरफार नोदींसाठी तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तहसिलदार  यांनी यावेळी केले.

या अभियानातंर्गत बुधावर दिनांक 10 फेब्रुवारी 2021 रोजी निकाली नोदींच्या प्रकरणांचे वितरण तहसिलदार स्वप्नील रावडे यांच्या हस्ते  करण्यात  आले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी  नंदकुमार शिंदे भोसेचे मंडल अधिकारी नागनाथ जोध, मंगळवेढ्याचे मंडल आधिकारी सोमनाथ जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी नागणे, डोणजचे गाव कामगार तलाठी राहुल बेशकराव, माचनुरचे गाव कामगार तलाठी विनोद बनसोडे, हुन्नूरच्चा गाव कामगार तलाठी नाजमीन मौलवी, पाटखळच्या गावकामगार तलाठी शहामुबाला कुंभार,हौसाप्पा शेवडे, सिद्धेश्वर मेटकरी,  मायाप्पा गावडे, विकास पुजारी, तालुक्यातील शेतकरी वर्ग महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोसेचे मंडलधिकारी नागनाथ जोध यांनी केले व आभार प्रदर्शन मंगळवेढ्याचे मंडलाधिकारी  सोमनाथ जाधव यांनी मानले.

Pages