शेतीसाठी भिवंडीतल्या शेतकऱ्याने खरेदी केले चक्क 30 कोटींचं हेलिकॉप्टर - Pantnagari Times

Breaking News

Monday, February 15, 2021

शेतीसाठी भिवंडीतल्या शेतकऱ्याने खरेदी केले चक्क 30 कोटींचं हेलिकॉप्टर


 

मुंबई: हौसेला मोल नसतं.. हेच भिवंडी तालुक्यातील वडपे इथल्या शेतकरी असलेल्या उद्योजकाने दाखवून दिलं आहे. जनार्दन भोईर यांनी शेतीकामाशी जोडधंदा असलेल्या व्यवसायासाठी चक्क हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. त्यांच्या या हेलिकॉप्टर खरेदीची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे.


भिवंडीमध्ये गोदाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारल्याने या भागात आर्थिक सुबत्ता आली आहे. वडपे गावात राहणारे आणि मूळचे शेतकरी असलेले जनार्दन भोईर यांनी चक्क 30 कोटी रुपयांचं हेलिकॉप्टर खरेदी केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. भोईर यांनी बांधकाम व्यवसायाला सुरुवात करून आपल्या जमिनीवर गोदाम बनवले आहे. तर काही विकासकांना जमीन विकसित करायला दिली आहे.

स्वतःच्या दुग्ध व्यवसायासाठी पंजाब, हरियाणा, गुजरात आणि राजस्थान या ठिकाणी नेहमी जावं लागतं. तर व्यवसायिक संबंधातील व्यक्तींना या भागात येण्यासाठी हेलिकॉप्टर घेण्याचा निर्णय घेतल्याचं भोईर यांनी सांगितलं आहे.


येत्या 15 मार्चला भोईर यांच्याकडे हेलिकॉप्टर येणार आहे. त्यापूर्वी जागेवरील व्यवस्थेची चाचपणी करण्यासाठी मुंबईतून काही तंत्रज्ञ हेलिकॉप्टर घेऊन वरपे गावात आले. अडीच एकर जागेवर संरक्षण भिंती सह हेलिपॅड, हेलिकॉप्टर ठेवण्यासाठी गॅरेज, पायलट, इंजिनियर सुरक्षारक्षक यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.


दरम्यान हेलिकॉप्टरमध्ये भोईर स्वतः न बसता नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील विजय सदस्यांना फेरफटका मारून आणला आहे. भोईर यांचं हेलिकॉप्टर येण्यास अद्याप अवधी असला तरी त्यापूर्वीच त्यांची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे.


bhiwandi Farmer janardan bhoir Bought 30 cr helicopter vadape village

Pages