मंगळवेढा ब्रेकिंग ! शिवकृपा पंपावरून 1 लाख 24 हजार रुपये किमतीच्या डिझेलची चोरी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, February 10, 2021

मंगळवेढा ब्रेकिंग ! शिवकृपा पंपावरून 1 लाख 24 हजार रुपये किमतीच्या डिझेलची चोरी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल


 

मंगळवेढा / प्रतिनिधी

 मंगळवेढा-ब्रम्हपुरी रोडलगत माचणूर हद्दीत असलेल्या शिवकृपा पेट्रेाल पंपाच्या डिझेल टाकीत  पाईप टाकून मोटारीच्या सहाय्याने 1 लाख 24 हजार रुपये किमतीचे 1500 लिटर डिझेल चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली असून या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान,या डिझेल चोरीमुळे पंपधारकामधून खळबळ उडाली आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,ब्रम्हपुरी गावालगत माचणूर हद्दीत शिवकृपा  हा पेट्रोल पंप आहे.दि. 9 च्या पहाटे कोणी तरी अज्ञात चोरटयाने  जमिनीत असलेल्या डिझेल टँकचे टोपण काढून पाठीमागील शेतातून येवून पाईपव्दारे मोटारीच्या सहाय्याने 1500 लिटर डिझेलची चोरी केली असल्याची फिर्याद विवेक पाटील यांनी दिली आहे.सदर घटनास्थळी 50 लिटरचे  रिकामे 5 ते 6  कॅन  पडलेले असून या ठिकाणी डिझेल सांडल्याचा उग्र वासही येत आहे.त्याचबरोबर घटनास्थळी एक टोकदार चाकूही पडल्याचे निदर्शनास येत आहे.दि. 9 रोजी मॅनेजर औदुंबर पाटील यांनी डिझेल व पेट्रोलचे ड्रिप टाकून स्टॉक चेक केला असता 1500 लिटर डिझेल कमी आढळून आले.घटनेच्या सकाळी 8.00 पर्यंत डिलीव्हरी बॉय म्हणून नितीन बेदरे (रा.बठाण),सौरभ गोसावी(रा.ब्रम्हपुरी) यांना डयुटीस नेमले होते. रात्री 11.58 ला एका ग्राहकाच्या ट्रॅक्टरमध्ये 30 लिटर डिझेल सोडले होते. त्यावेळी मशिनवर डिझेल स्टॉक 21.0241 लिटर दाखविला होता.सकाळी चेक केल्यानंतर 1500  लिटर डिझेल कमी आढळून आले असल्याचे पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.सहाय्यक पोलिस निरिक्षक भगवान बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक चव्हाण यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला तसेच पंपाच्या परिसरात रिकामे पडलेले कॅन व चाकू जप्त करण्यात आला आहे. या परिसरातील पंपावर डिझेल चोरीची घटना पहिलीच असून चोरटे पकडणे पोलिसांना एक आव्हान आहे.घरफोडया करीत चोरटयांनी आपला मोर्चा आता डिझेल पंपाकडे वळविल्याची चर्चा नागरिकांतून होत होती.

Pages