वंदे मातरम् पत्रकारसंघाच्या वतीने मराठी पत्रकार दिन साजरा पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द : योगेश तुरेराव - Pantnagari Times

Breaking News

Thursday, January 7, 2021

वंदे मातरम् पत्रकारसंघाच्या वतीने मराठी पत्रकार दिन साजरा पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द : योगेश तुरेराव


 

सोलापूर / प्रतिनिधी

 वंदे मातरम् पत्रकार संघाने आपल्या सर्व सदस्यांच्या सक्षमतेसाठी तसेच विकासासाठी सदैव कार्य केले असून भविष्यातही पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांच्या अडीअडचणीत खंबीरपणे उभा राहील असा विश्‍वास वंदे मातरम् पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच दैनिक अग्रणी वार्ताचे संपादक योगेश तुरेराव यांनी व्यक्त केला. वंदे मातरम् पत्रकार संघ आयोजित आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती तसेच मराठी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

कार्यक्रमाच्या सुरूवातीला संघटनेचे सल्लागार, साप्ताहिक लोक उध्दारचे ज्येष्ठ संपादक श्रीरंग वामन कदम यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर संघटनेच्या कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वंदे मातरम् पत्रकार संघाचे उपाध्यक्ष साप्ताहिक ‘सोलापूर हित’चे संपादक बाळू गोणे, सचिव तथा साप्ताहिक ‘क्रांती समाचार’ चे संपादक नागेश मग्रुमखाने, खजिनदार तथा साप्ताहिक ‘वर्चस्व’ चे संपादक नागेश तुरेराव, सहसचिव तथा साप्ताहिक ‘श्रीसंकेत’ चे संपादक महादेव जंबगी, संचालक - साप्ताहिक ‘नवदूत’ चे संपादक परमेश्‍वर आवताडे तसेच मंगळवेढा-पंढरपूर-सांगोला तालुक्याचे नुतन अध्यक्ष तथा साप्ताहिक ‘सूर्यनारायण’ चे संपादक औदुंबर ढावरे यांचेसह संघटनेचे सदस्य साप्ताहिक सिद्धेश्वर संदेश चे संपादक रमाकांत साळुंखे , देविदास मेटकरी, ओमशंकर हुलगेरी, राजू पवार, विजयकुमार झुंजा, रोहन नंदाने, सचिन करजगी, विनय तुरेराव, ज्येष्ठ संपादक नरेश काकडे, कलश ग्राफिक्स अ‍ॅन्ड प्रिंटर्सचे व्यंकटेश कोंगारी, अखिलेश येमूल, आदी उपस्थित होते. 

वंदे मातरम् पत्रकार संघ मंगळवेढा-पंढरपूर-सांगोला तालुका अध्यक्षपदी 

साप्ताहिक ‘सूर्यनारायण’ चे संपादक औदुंबर ढावरे यांची निवड 

आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती तथा मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून वंदे मातरम् पत्रकार संघाच्या मंगळवेढा-पंढरपूर-सांगोला तालुका अध्यक्षपदी साप्ताहिक ‘सूर्यनारायण’ चे संपादक औदुंबर ढावरे यांची निवड करण्यात आली. सदर निवडीचे पत्र त्यांना संघटनेचे अध्यक्ष योगेश तुरेराव, उपाध्यक्ष बाळू गोणे आणि सचिव नागेश मग्रुमखाने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांकडून औदुंबर ढावरे यांच्या निवडीबद्दल सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

Pages