सोलापूर / प्रतिनिधी
पत्रकार सुरक्षा समितीची विभागीय बैठक सोलापूर येथे पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य उपाध्यक्ष मल्लिनाथ जळकोटे होते या बैठकीत पत्रकार संरक्षण कायदा राज्यातील जेष्ठ पत्रकारांना समान पेन्शन राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी पत्रकारांवरील दाखल केलेल्या गुन्ह्यांची स्वतंत्र चौकशी पत्रकारांसाठी घरकुल व विमा योजना राज्यातील युट्युब चॅनल ला शासकीय मान्यता कोरोना रोगाने निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसाला पन्नास लाख रुपये तात्काळ मदत या सह पत्रकारांच्या विविध विषयांवर सखोल चर्चा होऊन राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नाबाबत आंदोलने त्रीव्र करण्याच्या निर्धार करण्यात आला
राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नाबाबत पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून अनेक वर्षापासून आंदोलने उपोषणे व पत्रव्यवहार करून देखील हे सरकार पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी झाले असून लवकरात लवकर राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवा अन्यथा पत्रकारांना घेऊन मंत्रालय समोर आंदोलन करण्याचा इशारा राज्य उपाध्यक्ष मल्लिनाथ जळकोटे यांनी मुख्यमंत्री यांना दिला आहे
या बैठकीला प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना मराठवाडा विभाग अध्यक्ष कलीम शेख अक्षय बबलाद बिपीन दिड्डी, भास्कर माचन, लक्षमण गणपा, महंमद शेख, नवनाथ जाधव, राजाभाऊ पवार, धर्मण्णा गोरे, इम्तियाज अक्कलकोटकर, सतीश गडकरी, रामचंद्र सरवदे, शब्बीर मणियार, वैजिनाथ बिराजदार, आन्सर तांबोळी, डॉ रवींद्र सोरटे, बाबा काशीद, कल्पना तेलंग, प्रियंका साळुंखे, अरुण सिदगिड्डी, अशोक माचन, गिरीश गोसकी, श्रीनिवास कोडंम, गणेश पडसाळकर, शहाजी शिंदे, अमर पवार, ज्ञानेश्वर गवळी भगवान कदम, शिवलींग म्हेत्रे सर्जेराव गायकवाड इत्यादी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते