मंगळवेढा / प्रतिनिधी
रेवेवाडी तालुका मंगळवेढा येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी धनंजय भीमा चौगुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
रेवेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच मालन पोपट शिंदे यांचा कार्यकाल संपल्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागी ठरल्याप्रमाणे धनंजय भीमा चौगुले यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली.
यावेळी विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके धनगर समाजाचे नेते जगन्नाथ रेवे, रेवेवाडी चे सरपंच ब्रह्मदेव रेवे, ग्रामसेवक शिकंदर इनामदार, माजी चेअरमन बसवराज पाटील, हुन्नूर चे सरपंच मच्छिंद्र खताळ, पडोळकरवाडीचे सरपंच मरगु कोळेकर, महमदाबादचे उपसरपंच यशवंत होळकर , येळवी तालुका जत येथील सरपंच विजय कुमार पोरे, व उपसरपंच सुनील अंकलगी, संगमेश्वर चौगुले,व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूतन उपसरपंच धनंजय चौगुले यांनी सत्कारास उत्तर देताना सांगितले की आमचे मार्गदर्शक व पार्टीप्रमुख जगन्नाथ रेवे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या संधीचे सोने करीन व गोरगरीब जनतेची सेवा करणार असल्याचे सांगितले.