मंगळवेढा / प्रतिनिधी
मंगळवेढा शहरातील हजरत शेख जैनुद्दीन दर्गाह ऊरूसच्या अध्यक्षपदी कय्युम मुल्ला यांची नियुक्ती करण्यात आली.
मंगळवेढा शहरातील बोराळे नाका येथील मुलाणी कब्रस्तान येथे हजरत शेख जैनुद्दीन दर्गाह असून त्यांचा दि.24 फेब्रुवारी 2021 रोजी ऊरूस होणार आहे.मुलाणी गल्ली येथे मुलाणी समाजाच्या बैठकीत हजरत शेख जैनुद्दीन दर्गाह यांच्या ऊरूसच्या अध्यक्षपदी कय्युम मुल्ला यांची निवड जाहीर करण्यात आली.ऊरूस कमिटीचे नूतन अध्यक्ष कय्युम मुल्ला यांचा मुलाणी समाज मस्जिद, दर्गाह व कब्रस्तान वक्फचे अध्यक्ष फिरोज मुलाणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मुलाणी मस्जिदचे पेशईमाम आब्बास मुलाणी, मजीद मुल्ला,मुसा मुलाणी,ताजोद्दीन मुलाणी, इक्बाल मुलाणी,अजित यादव,मोहीद्दीन मुलाणी, मसाहेब अमीन शेख,शौकत मुलाणी,जावेद मुलाणी,इसाक मुलाणी,वाजीद कोकणे,आरीफ मुलाणी,नदीम मुलाणी,आदिल मुलाणी, मुनीर मुल्ला,अन्वर मुल्ला,खाजामत मुजावर, इन्नूस बागवान,हमीद शेख,सोहेल मुलाणी,सिंकदर बागवान, निहाल मुजावर, आरिफ शेख,अक्रम मुलाणी आदी उपस्थित होते.
फोटो ओळी:- मंगळवेढा शहरातील हजरत शेख जैनुद्दीन दर्गाह ऊरूस अध्यक्षपदी कय्युम मुल्ला निवड झाले बद्दल त्यांचा सत्कार करताना जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस फिरोज मुलाणी. सोबत मजीद मुल्ला, आब्बास मुलाणी, इक्बाल मुलाणी, इसाक मुलाणी, जावेद मुलाणी, मुसा मुलाणी आदी.