ग्रामपंचायतीसाठी काय पण! निवडणूक लढण्यासाठी पठ्ठ्याने दिला पोलीस नोकरीचा राजीनामा - Pantnagari Times

Breaking News

Friday, January 1, 2021

ग्रामपंचायतीसाठी काय पण! निवडणूक लढण्यासाठी पठ्ठ्याने दिला पोलीस नोकरीचा राजीनामा


 

शिक्रापूर / प्रतिनिधी

सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची धूम सुरू आहे. गाव आपल्सयाचा ताब्यात राहावे यासाठी पॅनलप्रमुखांची धावपळ सुरू आहे. यामध्ये आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून अनेकजण काहीही करायला तयार आहेत. हिवरे कुंभार गावातील एका पठ्ठ्याने तर ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी चक्क पोलीस नोकरीचा राजीनामा दिला आहे.

अमोल चंद्रकांत शिर्के या उमेदवाराचे नाव आहे. त्याने महाराष्ट्र पोलीस दलातील नोकरीचा राजीनामा देऊन हिवरे कुंभार ग्रामपंचायतच्या विकासाचे ध्येय समोर ठेवून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे तर अर्ज दाखल करतेवेळी अमोल यांनी त्यांना ग्रामपंचायतचे सदस्य व सरपंच म्हणून संधी मिळाल्यास हिवरे गावच्या विकासासाठी 1 कोटी रुपयांचा विकासनिधी स्वतःच्या जबाबदारीवर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

जवळपास पंधरा वर्षांच्या महाराष्ट्र पोलीस दलातील प्रशासकीय कामाचा व अनुभवाचा फायदा पुढील पाच वर्षे हिवरे कुंभार गावच्या विकासासाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमोल शिर्के यांनी हिवरे कुंभार गावच्या विकासासाठी निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन देखील केले आहे.

Pages