सोलापूर / प्रतिनिधी
पत्रकार सुरक्षा समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रभारी जिल्हा अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार होते
या बैठकीत पत्रकार संरक्षण कायदा, जेष्ठ पत्रकारांना समान पेन्शन, पत्रकारांसाठी घरकुल योजना, पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यांची चौकशी, कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसास तात्काळ पन्नास लाख रुपये मदत
या सह अनेक विषयावर चर्चा होऊन पत्रकार सुरक्षा समिती च्या सोलापूर शहर नूतन पदाधिकारी यांची एकमताने निवड करण्यात आली या बैठकीत प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी मार्गदर्शन करून पत्रकारांच्या प्रश्नावर आंदोलने मोठया प्रमाणात करावी लागणार असल्याचे सांगून संघर्ष शिवाय पत्रकारांचे प्रश्न सुटणार नाहीत असे सांगितले
नूतन पदाधिकारी खालील प्रमाणे
शहर अध्यक्ष डॉ रवींद्र सोरटे
शहर कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी
शहर संघटक धर्मण्णा गोरे
उपाध्यक्ष बिपीन दीड्डी
यांची निवड करण्यात आली असून पत्रकार सुरक्षा समिती चे राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना यांच्या हस्ते नूतन पदाधिकारी यांचा शाल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी अक्षय बबलाद, अरुण सिदगीड्डी, प्रदीप भोसले, सतीश गडकरी, इस्माईल शेख, लक्ष्मण गणपा, शब्बीर मणियार, प्रसाद जगताप, डी डी पांढरे, प्रशांत गणपा, अभिषेक चिलका, इम्तियाज अक्कलकोटकर, रोहित घोडके, मोहंमद शेख, मोदींन शेख, बाबा काशीद, अविनाश आवले, मुस्ताक कारभारी, नारायण म्हंता, हरी भिसे, युनूस अत्तार शब्बीर शेख इत्यादी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते