मंगळवेढा / प्रतिनिधी
हुन्नूर ता. मंगळवेढा येथे आळंदी येथील राष्ट्रीय कीर्तनकार यांच्या समाज प्रबोधनाने व कीर्तन भजनाने सामाजिक कार्यकर्ते कै. दत्तात्रय जकाप्पा क्षिरसागर यांची प्रथम पुण्यतिथी साजरी करण्यात आली. राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. सुनिताताई आंधळे यांचे रात्री नऊ वाजता कीर्तन व भजन ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हुन्नूर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती विशेषात महिला वर्गाची सुद्धा कार्यक्रमाला उपस्थिती होती. राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. सुनिताताई आंधळे यांनी आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन केले बाल हत्या कशा रोकाव्या यावर तरुणांना सल्ला दिला आपल्या कीर्तनातून मुली वाचवा अभियान व मुली चे महत्व जमलेल्या नागरिकांना पटवून दिले हुंडाबळी काय व त्याचे परिणाम चे महत्व सांगितले आपल्या घरातील मुलांना आईवडिलांनी कसा सांभाळ करावा, शिक्षण कसे शिकवावे व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आपल्या खास शैलीतून राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. सुनिताताई आंधळे यांनी किर्तन व भजनाने परिसरातील नागरिकांना व महिला वर्गांना समाज प्रबोधन केले
सकाळी नऊ वाजता भोसे येथील ह.भ.प. काटकर महाराज यांचे कीर्तन व भजन आरती होऊन दुपारी बारा वाजता कै. दत्तात्रय जकाप्पा क्षिरसागर यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली त्यानंतर पुण्यतिथीनिमित्त जमलेल्या नागरिकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी श्री संत चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष पुंडलिक साळे, हुन्नूरचे उपसरपंच प्रवीणकुमार साळे, हुन्नूरचे ग्रामसेवक सिकंदर इनामदार, माजी सरपंच शशिकांत काशीद, माजी सरपंच दगडू सुतार, काकासो मिस्कर, जगन्नाथ रेवे, तमाकाका चौगुले, माजी उपसरपंच राजाराम पुजारी, रेवेवाडी वाडीचे सरपंच ब्रह्मदेव रेवे , महमदाबाद चे सरपंच सुरेश हत्तीकर, मानेवाडी चे सरपंच दत्ता मळगे, माजी फॉरेस्ट अधिकारी महादेव इंगोले, सचिन शिंदे ,भगवान माने, सुरेश चव्हाण, तुशांत माने, महादेव पाटील, राष्ट्रीय नाभिक संघटनेचे अध्यक्ष राजू पवार ,काशिलिंग खताळ, रावसाहेब कोरे, दत्ता साळुंखे ,विकास पुजारी, सचिन कोळेकर, बि.टी.पुजारी, बाळू घुंबरे, लक्ष्मण पांढरे, सलामत शेख, तात्या गावडे, शरद गावडे, दत्ता सुर्यवंशी, एच. एम. यमगर, इब्राहिम मुलानी, आनंद लवटे ,देवाप्पा पुजारी ,बापू पुजारी, बंडा चौगुले, संतोष चौगुले, गोडाप्पा पुजारी, शिवाजी नाईक, बाळू सुर्यवंशी, बटू सुतार,सुभाष काशीद, असलम मुलानी, महेश चौगुले, विलास जाधव,मारुती होनमोरे,औदुंबर माने, नवनाथ पुजारी, बिरा पुजारी, मनगिनी पुजारी, विनायक पुजारी, आदी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुण्यतिथीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष क्षिरसागर, भाऊ क्षिरसागर, प्रताप जगताप, जकराया क्षिरसागर,रवी शिरसागर, चंदू क्षिरसागर, शिवाजी क्षिरसागर, सोनू क्षिरसागर, किसन क्षिरसागर, प्रकाश क्षिरसागर, यांनी केले.